ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन, विविध क्रीडा प्रकारात एक हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार !

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ -: महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 1 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या सर्व 16 परिमंडलांतील एक हजारांहून जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत.

महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 2023-24 या वर्षाकरिता या स्पर्धेचे यजमानपद छत्रपती संभाजीनगर परिमंडलाकडे आहे. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (1 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन) संजय ताकसांडे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (वित्त) अनुदीप दिघे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण रविवारी (4 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातच संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (वित्त) अनुदीप दिघे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे, स्पर्धेचे मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

स्पर्धेत टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ खो-खो, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बॅडमिंटन आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे. वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रकारात विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या नेमण्यात आल्या असून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि आयोजन समितीचे सचिव तथा छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ‍विश्वास पाटील परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!