ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण
Trending

अंबादास दानवे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला, ज्यांना ‘डिमोशन’चे बक्षिस मिळाले, तेच चव्हाणांना प्रवेश देणार !

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ – आज अशोक चव्हाण औपचारीकपणे भाजपवासी होणार, अश्या बातम्या आहेत. खरं तर ते एका उंचीचे लोकनेते आहेत. त्यांचा प्रवेश देश पातळीवरील एखाद्या नेत्याने करून घेणे अपेक्षित होते ज्याला चव्हाणांच्या बरोबरीचा जनाधार आहे. पण ज्यांना ‘डिमोशन’चे बक्षिस मिळाले, तेच चव्हाणांना प्रवेश देणार आहेत म्हणे. सोबत आमदारकीसाठी हातपाय आपटणारे एक बारावे खेळाडू असणार आहेत म्हणे, असा टोला विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता दानवे यांनी ही टीका केली.

माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यसमिती सदस्य पद (Member of Congress Working Committee), महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे सदस्यत्व आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण आज दुपारी प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यानंतर ते मेळाव्यातून संबोधीत करणार आहेत. या सर्व घडामोडीवर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. ज्यांना ‘डिमोशन’चे बक्षिस मिळाले, तेच चव्हाणांना प्रवेश देणार आहेत म्हणे अशी नाव न घेता दानवे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!