ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

सेटसाठी साडेनऊ हजार विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगर शहरात 22 केंद्रावर रविवारी परीक्षा !

छत्रपती संभाजीनगर, दि.५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने येत्या रविवारी (दि.सात) घेण्यात येणा-या राज्य पात्रता चाचणी अर्थात ’सेट’साठी छत्रपती संभाजीनगरात २२ केंद्र असणार आहेत. या केंद्रावर एकूण ९ हजार ६३० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती समन्वयक डॉ.सतीश दांडगे यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा साठी ३९ वी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला एकूण १ लाख २८ हजार २४३ विद्यार्थी बसणार आहेत. महाराष्ट्रात १६ शहरे व गोव्यातील पणजी अशा एकूण १७ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून एकूण २९८ परीक्षा केंद्र असणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात ही परीक्षा होणार आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर हे देखील सेट परीक्षा केंद्र असून या केंद्रावर एकूण ९ हजार ६३० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी एकूण २२ परीक्षा केंद्र असणार आहेत. छत्रपती संभाजीनगरतील परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे-

मौलाना आझाद महाविद्यालय, टॉमपॅट्रीक महाविद्यालय, डॉ.रफिक झकेरिया महाविद्यालय (नवखंडा), सरस्वती भूवन कला महाविद्यालय, एस.बी.विज्ञान महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, व्ही.एन.पाटील विधि महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, मिलिंद कला महाविद्यालय, इंदिरा बाई पाठक महिला महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पीईएस पॉलटेक्निक कॉलेज, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालय तसेच वसंतराव नाईक महाविद्यालय असा २२ केंद्राचा समावेश आहे. या सर्व केंद्रावर रविवारी सकाळी १० ते ११ तसेच दुपारी ११ः३० ते ०१ः३० या दरम्यान ही परीक्षा होईल, परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

पुढील परीक्षा ’ऑनलाईन’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या तीन दशकात ३९ सेट परीक्षा घेण्यात आल्या आहेत. ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असून यापुढील ४० वी सेट ही ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.विजय खरे यांनी दिले. कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने ऑनलाईन ’सेट’ आयोजित करण्याचा दृष्टीने सर्व तयारी केली आहे. तर एनीटीए ’नेट’ ही राष्ट्रीय चाचणी जवळपास पाच वर्षांपासून ’ऑनलाईन’ पध्दतीने घेण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!