युवकाचा खून, रक्तबंबाळ अवस्थेत घराच्या ओट्यावर चार ते पाच तासांपासून पडून !
छत्रपती संभाजीनगर, दि. २६ – युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर युवक रक्तबंबाळ अवस्थेत घराच्या ओट्यावर चार ते पाच तासांपासून पडून होता.
नक्षत्रवाडी खळवाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला. सचिन पागोरे असे मृताचे नाव आहे. सतिश भालेराव उर्फ सत्तर व महिला असे संशयिताचे नाव आहे.
यासंदर्भात दादासाहेब बाबूराव पागोरे (वय ५५, रा. नक्षत्रवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सतिश भालेराव याच्या घराच्या ओट्यावर फिर्यादीचा मुलगा सचिन पागोरे हा त्याच्या तोंडातून रक्त निघून संपूर्ण चेह-यावर लागलेले होते. त्यावरून तो चार ते पाच तासांपासून त्या ठिकाणी पडलेला असवा. त्यास सतिश भालेराव याने व त्याच्या सोबत राहणारी बाई यांनी सचिन यास उपचारकामी दवाखाण्यात घेवून जायाला पाहिजे होते परंतु त्यांनी तसे केले नाही.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
उलट आम्हाला फोन करून उशिराने माहिती दिली. त्यामुळे सतिश भालेराव त्याच्यासोबत राहणारी बाई हे दोघे दारु विक्रीचा व्यवसाय करतात. सचिन यास दारू पिण्याच्या कारणावरून त्यांनी मारहाण केलेली असावी व त्यामध्ये तो मृत झालेला असावा असा संशय फिर्यादी यांनी सतिश भालेराव ऊर्फ सत्तर तसेच त्याच्या सोबतच्या बाईवर फिर्यादीत व्यक्त केला आहे.
मृताच्या वडिलाने दिलेल्या फिर्यादीनुसार सातारा पोलिस स्टेशनमध्ये सातारा गुरन 236/2024 कलम 302, 34 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि सोनवणे करत आहे.