क्राईमताज्या बातम्या
Trending

महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी ! पीडितेच्या मुलीचा सांभाळ करण्याची हमी देवून वारंवार शरीर संबंध !!

पीडितेची मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ – लग्नाचे आमिष दाखवून तसेंच पीडित महिलेच्या मुलीचा सांभाळ करण्याची हमी देवून आरोपीने फिर्यादीसोबत वारंवार शरीरसंबध प्रस्थापीत करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

दि. १ जानेवारी २०२० ते ६ मार्च २०२३ दरम्यान इंदुनगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे आरोपीने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तानाजी साहेबराव ओळेकर (वय ३०, रा. तळणी, बदनापूर, जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

यातील महिला फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, आरोपीनेने फिर्यादीस विश्वासात – घेवून फिर्यादीसोबत ओळख काढली. फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून तसेंच फिर्यादीच्या मुलीचा सांभाळ करण्याची हमी देवून आरोपीने फिर्यादीसोबत वारंवार शरीरसंबध प्रस्थापीत केले. फिर्यादी महिलेसोबत लग्न न करता फिर्यादी महिलेने जर पोलिसात तक्रार दिली तर तिचे फोटो व्हयरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी महिलेस शिवीगाळ केली व फिर्यादीच्या इच्छेविरुध्द गर्भपाताच्या गोळ्या खावू घालून गर्भपात केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तानाजी साहेबराव ओळेकर (वय ३०, रा. तळणी, बदनापूर, जि. जालना) यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये गु.र.न 151/2024 कलम 376(2) (n) ,417,313, 504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि भागिले करीत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!