सावंगी, चौका, चिकलठाणा, कुंभेफळ, वरझडी, पांढरी, चितेगावसह 19 गावांमध्ये मराठा कुणबी नोंदी आढळल्या ! जात प्रमाणपत्राचे अर्ज भरून घेण्यासाठी तलाठी, ग्रामसेवकांनी मदत करण्याचे तहसिलदार मुंडलोड यांचे आदेश !!
छत्रपती संभाजीनगर, दि. १९ – छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी, कुंभेफळ, चौका, चिकलठाणा, वरझडी, पांढरी, चितेगावसह 19 गावांमध्ये मराठा कुणबी नोंदी आढळल्या आहेत. संबंधीत गावामध्ये मराठा कुणबी नोंद आढळलेल्या व्यक्तीची यादी तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात डकवण्यात आली आहे. जात प्रमाणपत्राचे अर्ज भरुन घेण्यासाठी तलाठी, ग्रामसेवकांनी मदत करण्याचे आदेश तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिले आहेत.
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी यांना आदेशीत केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांची बैठक बोलावून निर्देश दिले होते. तहसीलदारांनीही याची गंभीर दखल घेवून मराठा आरक्षासंदर्भातील मराठा कुणबी नोंदी आढळलेल्या गावामध्ये यादी डकवण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी आज, १९ जानेवारी रोजी भास्कर मराठीला दिलेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ, चौका, विठ्ठलपूर, फेरण जळगाव, आडगाव बु, सावंगी, चिकलठाणा, सहजापुर, झाल्टा, निपाणी, वरुड, ढवळापुरी, जयपूर, वरझडी, पांढरी, चितेगाव, लामकाना, खोडेगाव, पोखरी, वाहेगाव, मुरुमखेडा आदी 19 गावांमध्ये मराठा कुणबी नोंदी आढळून आलेले आहेत.
संबंधीत गावामध्ये मराठा कुणबी नोंद आढळलेल्या व्यक्तीची यादी तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात डकवण्यात आली आहे व तसेच गावांमध्ये दवंडीव्दारे व लाऊड स्पिकरव्दारे कुणबी नोंद असलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करण्याचे आदेशीत केले आहे. त्या प्रमाणे ई- महा सेवा केंद्र, आपले सरकार सेतु सुविधा केंद्र यांना पण जात प्रमाणपत्राचे अर्ज भरुन घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत व त्यांना या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करण्यासाठी आदेशीत केलेले आहेत. तसेच विशेष कॅम्प आयोजित करण्यात आली असल्याची माहितीही छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी भास्कर मराठीला दिली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe