क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

मलकापूर अर्बन बॅंकेला ९ कोटींचा गंडा : कर्जदार, जामीनदारासह बॅंकेचे तत्कालीन सीईओ व मॅनेजरवर गुन्हा !

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ – खोट्या कागदपत्रांच्या आधारे दि मलकापूर अर्बन बॅंकेची ९ कोटींची फसवणूक करणारे कर्जदार, जामीनदारासह बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी व शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी अभिषेक जगदीश जैस्वाल प्रो.प्रा.मेसर्स शक्ती एजन्सी यांनी, तसेच जामीनदार श्रीमती श्वेता जैस्वाल जामीनदार अंबरिश जगदीश जैस्वाल यांनी इतर साथीदारांच्या मदतीने आपसात संगनमत केले. समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर येथील मिळकत न.भु. क्रं. 17850/2 क्षेत्रफळ 2395.94 चौ.मि. चे बनावट कागदपत्रे तयार केली.

या कागदपत्रांची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केलेली नसताना रजिस्ट्री दस्तऐवज क्रमांक 12777/2018 दि. 31/12/2018 अन्वये नोंदणी केलेली आहे असे दर्शवून त्या मालमत्तेवर 09 कोटी रुपये मुदती कर्जासाठी दि. मलकापूर अर्बन को.ऑप. बँक लि.मलकापूर शाखा रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे कर्ज फाईल दाखल केली.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

बँकेचे शाखा व्यवस्थापक, जागेची स्थळ पाहणी करणारे बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोतीराम सावजी, मुल्यांकन अहवाल देणारे तसेच इतर अधिकारी यांनी संगनमत करून बनावट दस्ताचे आधारे 09 कोटी रुपये मुदती कर्ज मंजुर करून ते मेसर्स शक्ती एजन्सीज, प्रो.प्रा.अभिषेक जैस्वाल यांना वितरीत करून दि. मलकापूर अर्बन को.ऑप. बँक लि.मलकापूर बँकेंची 9,00,00,000/-(नऊ कोटी रु.) रुपयांची फसवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी दि मलकापूर अर्बन को. ऑप बॅंकेचे वसुली अधिकारी राजेंद्र नामदेव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) अभिषेक जगदीश जैस्वाल वय 39 वर्ष, प्रो.प्रा.मेसर्स शक्ती एजन्सी रा. नूतन कॉलनी, . छत्रपती संभाजीनगर 2) श्रीमती श्वेता अभिषेक जैस्वाल 3) अंबरिश जगदीश जैस्वाल वय 42 वर्ष 4) बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोतीराम सावजी ५) बॅंकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक ६) जागेचे मुल्यांकन अहवाल देणारे ७) अभिषेक जैस्वाल यांना मदत करणारे आदींवर वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोनि संभाजी पवार हे करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!