ऑनलाईन ट्रेडींगच्या नावाखाली महिलेची २६ लाखांची फसवणूक ! KKR ग्रुप ट्रेंडीगच्या नावाखाली घातला गंडा !!
छत्रपती संभाजीनगर, दि. १४ – विश्वास संपादन करून महिलेला २६ लाख ६० हजारांची गुंतवणूक करायला लावली. त्यानंतर ऑनलाईन ट्रेडींगच्या नावाखाली सदर महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला आहे.
अनुराग ठाकुर असे आरोपीचे नाव आहे. यातील महिला फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना अनुराग ठाकुर व त्यांच्या इतर साथीदार यांनी KKR ग्रुप ट्रेंडीग असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वासघात केला. ऑनलाईन ट्रेडींगच्या नावाखाली फिर्यादी महिलेकडून एकूण 26,60,000/-रुपये इन्व्हेस्ट करून घेवून फिर्यादीची फसवणुक केली असल्याची फिर्याद महिलेने एम सिडको पोलिस ठाण्यात दिली आहे.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अनुराग ठाकुर यांच्यावर 188/2024 कलम – 419,420, 465,468, 34 भादिव सह कलम 66(C), 66(D) IT ACT नुसार एम सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि गौतम पातारे करीत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe