विद्यमान खासदार इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, हर्षवर्धन जाधव, संदिपान भुमरे यांच्यात प्रतिष्ठेची लढत ! नामनिर्देशन पत्र छाननीत ४४ जणांचे अर्ज वैध; ७ अवैध !!
लोकसभा निवडणूक २०२४ - छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ
छत्रपती संभाजीनगर, दि.२६ :- लोकसभा निवडणूक २०२४ साठी नामनिर्देशन अर्जांची आज छाननी झाली. त्यात एकूण ५१ उमेदवारांचे ७८ अर्ज दाखल होते. त्यापैकी ४४ जणांचे अर्ज वैध ठरले तर ७ जणांचे अर्ज अवैध ठरले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
आज सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन सभागृहात नामनिर्देशन छाननी प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकट राठोड तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. ही प्रक्रिया निवडणूक निरीक्षक कांतिलाल दांडे व राजशेखर एन यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उमेदवार, त्यांचे सूचक, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
छाननी प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी स्वामी यांनी संवाद सेतू कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम दिवसाअखेर ५१ उमेदवारांचे ७८ अर्ज प्राप्त झाले होते. भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा कलम ३६ व ३३ मधील तरतुदींनुसार ३६ निकषांच्या आधारे छाननी करण्यात आली. ज्यांची नामनिर्देशने रद्द झाली त्यांचे पूर्ण शंका निरसन होईपर्यंत कालावधी देण्यात आला. ही सर्व प्रक्रिया उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, तसेच निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. छाननी प्रक्रियेनंतर लगेचच अर्ज माघारी घेण्याचा कालावधी सुरु झाला आहे. ज्यांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावयाचा असेल ते कार्यालयीन कामकाजाच्या वेळात स्वतः अथवा आपल्या प्रतिनिधींमार्फत अर्ज माघारी घेऊ शकतात,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे याप्रमाणेः-
१. हर्षवर्धन रायभान जाधव, अपक्ष
२. मनिषा खरात, बहुजन महाराष्ट्र पार्टी
३. खान एजाज अहमद, अपख
४. सुरेश आसाराम फुलारे. अपक्ष
५. खाजा कासीम शेख, अपक्ष
६. बबनगिर उत्तमगिर गोसावी, हिंदुस्थान जनता पार्टी
७. किरण सखाराम बर्डे, अपक्ष
८. देविदास रतन कसबे, अपक्ष
९. जगन्नाथ किसन उगले, अपक्ष
१०. चंद्रकांत भाऊराव खैरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
११. अरविंद किसनराव कांबळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
१२. संदिपानराव आसाराम भुमरे, शिवसेना
१३. अब्दुल अजीम अब्दुल अजीज शेख, अपक्ष
१४.रविंद्र भास्करराव बोडखे, भारतीय युवा जन एकता पार्टी
१५. संजय भास्कर शिरसाट, अपक्ष
१६. मोहम्मद नसिम शेख, अपक्ष
१७. सुरेंद्र दिगंबर गजभारे, अपक्ष
१८. साहेबखान यासिनखान पठाण, अपक्ष
१९. गोरखनाथ राजपूत राठोड, अपक्ष
२०. प्रतीक्षा प्रशांत चव्हाण, आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष
२१. जियाउल्लाह अकबर शेख, अपक्ष
२२. जगन्नाथ खंडेराव जाधव, अपक्ष
२३. भालेराव वसंत संभाजी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी
२४. पंचशिला बाबुलाल जाधव, रिपब्लिकन बहुजन सेना
२५. संगिता गणेश जाधव, अपक्ष
२६. घुगे नितीन पुंडलिक, अपक्ष
२७.सय्यद इम्तियाज जलील, ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन
२८. संजय उत्तमराव जगताप, बहुजअन समाज पार्टी
२९. नारायण उत्तम जाधव, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक)
३०. मिनासिंग अवधेशसिंग सिंग, अपक्ष
३१. प्रशांत पुंडलिकराव आव्हाळे, अपक्ष
३२. त्रिभुवन मधुकर पद्माकर, अपक्ष
३३. मनोज विनायकराव घोडके, अपक्ष
३४. विश्वास पंडीत म्हस्के, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक)
३५. डॉ. जीवनसिंग भावलाल राजपूत, अपक्ष
३६. विशाल उद्धव नांदरकर, वंचित बहुजन आघाडी
३७.अफसर खान यासिन खान, वंचित बहुजन आघाडी
३८. भरत पुरुषोत्तम कदम, राष्ट्रीय मराठा पार्टी
३९. अर्जून भगवानराव गालफाडे, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
४०. संदीप देविदास जाधव, अपक्ष
४१.लतीफ जब्बार खान, अपक्ष
४२. संदीप दादाराव मानकर, अपक्ष
४३. अब्दुल समद बागवान, एआयएमआयएम (आयएनक्यु)
४४. भानुदास पिता रामदास सरोदे पाटील, अपक्ष
अवैध ठरलेले नामनिर्देशन याप्रमाणेः-
१. नंदा सुभाष मुके- भारतीय जवान किसान पार्टी
२. श्रीराम बन्सिलाल जाधव-जय सेवालाल बहुजन विकास पार्टी
३. रंजन गणेश साळवे- इन्सानियत पार्टी
४. शेख समीर शेख शफिक-सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडीया
५. सुरेश धोंडू चौधरी- अपक्ष
६. सचिन रामनाथ मंडलिक- अपक्ष
७. रामनाथ पिराजी मंडलिक- अपक्ष