ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

छत्रपती संभाजीनगर, दि.५ :– महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ या दोन महामंडळाचे कामकाज सोपविण्यात आले असून या महामंडळांचे कामकाज सुरु झाले आहे. राज्यातील गुरव व लिंगायत समाजातील घटकांसाठी व्यापार, उद्योग, शेतीपुरक व्यवसाय तसेच व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत.

कर्ज योजनांची माहिती खालीलप्रमाणे-

ऑनलाईन कर्ज योजना- राष्ट्रीयकृत , नागरी, सहकारी, शेड्युल्ड- मल्टिशेड्युल्ड बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या दरमहा नियमित परतफेड केलेल्या हप्त्यावरील १२ टक्के पर्यंतच्या व्याजाच्या व ५ वर्ष्हे पर्यंतच्या मुदत कर्जावरील व्याज रकमेचा परतावा लाभार्थ्यास ऑनळाईन पद्धतीने बचत खात्यात महामंडळातर्फे जमा करण्यात येईल. तथापि, लाभार्थ्यांनी बॅंकेकडे कर्जासाठी अर्ज करण्यापुर्वी महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. ऑनलाईन कर्ज योजनांसाठी अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईटवर अर्ज करावा.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

१) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना- व्यापार उद्योग, सेवा व शेतीपुरक व्यवसायासाठी लागणारे कर्ज, कर्ज मर्यादा १० लाख रुपये पर्यंत, अर्जदाराचे वार्षिक कौतुंबिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत.

२) गटकर्ज व्याज परतावा योजना- बचत गट, भागीदारी संस्था (निबंधक मुंबई प्राधिकृत), सहकारी संस्था (जिल्हा उपनिबंधक प्राधिकृत)इ. कर्ज मर्यादा १० ते ५० लक्ष रुपये, गटातील सभासदांची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये पर्यंत.

३) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना- पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी कर्ज, देशांतर्गत शिक्षणासाठी १० लाख रुपये, विदेशात शिक्षणासाठी २० लाख रुपये. (अभ्यासक्रम- आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी , व्यावसायिक –व्यवस्थापन, कृषी , अन्न प्रक्रिया व पशु विज्ञान. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये पर्यंत.

४) महिला स्वयंसिद्धी कर्ज व्याज परतावा योजना- महिला बचतगटांसाठी महिला अर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येईल. प्रथम टप्प्यात ५ लाख रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता व कर्ज परतफेडीनंतर द्वितीय टप्प्यात १० लाख रुपये कर्ज घेण्यास पात्र.

ऑफलाईन कर्ज योजना

१) थेट कर्ज योजना- १ लाख रुपये कर्ज महामंडळामार्फत, नियमित कर्ज परतफेडीवर व्याज आकारले जाणार नाही. थकित कर्जावर ४ टक्के व्याज आकारले जाईल. कर्ज परतफेड कालावधी ४ वर्षे (२०८५ रुपये मासिक हप्ता), अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये पर्यंत.

२) बीज भांडवल कर्ज योजना- राष्ट्रीय्कृत व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत राबविण्यात येईल. कर्जमर्यादा ५ लाख रुपये, बॅंक मंजूर कर्ज रकमेत महामंडळ सहभाग २० टक्के व बॅंकेचा सहभाग ७५ टक्के व लाभार्थ्याचा सहभाग ५ टक्के असेल. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये पर्यंत.

पात्रतेचे निकषः- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व इतर मागासवर्गीय असावा. महामंडळ, बॅंक अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, कुटुंबातील एकाच व्यक्तिस लाभ घेता येईल. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे, निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान, अनुभव असणे आवश्यक, कर्जाच्या अटी शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे असतील. सर्व व्याज परतावा योजनांसाठी लाभार्थ्याने कर्ज मंजूरीसाठी बॅंकेकडे जाण्यापुर्वी महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे.

गुरव व लिंगायत समाजाच्या बांधवांनी योजनांची अधिक माहिती, ऑफलाईन कर्ज योजनांच्या अर्जासाठी ‘ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आनि विकास महामंडळ, दुसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूलच्या बाजूला, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर – दूरध्वनी-०२४०-२३४१५४४ येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रमोद पोहरे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!