क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

खुल्लोडचा तलाठी लाचेच्या सापळ्यात ! १५ हजारांच्या लाच प्रकरणी दोघे ताब्यात, तिघांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २८ – वाळूचा ट्रॅक्टर चालू देण्यासाठी तलाठी, कोतवाल व एजंट लाचेच्या जाळ्यात अलगद अडकले. १५ हजारांच्या लाच प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले असून सिल्लोड पोलिस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

1. राहुल साहेबसिंग सुलाने वय 29 वर्ष तलाठी सजा खुल्लोड तहसिल कार्यालय सिल्लोड रा.जाटवाड रोड छत्रपती संभाजीनगर, 2. विठ्ठल त्र्यंबक राठोड वय 34 वर्ष, कोतवाल, केडगाव ता. सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 3. राहुल खैरे रा. सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार हे त्याचे गावातील विहिरीवर वाळू टाकत असून त्यांचे ट्रॅक्टर वरती दि. 13.02.2024 रोजी कारवाई झालेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचे मित्राकडून वाळू वाहतूक करण्यासाठी करारानुसार ट्रॅक्टर क्र. MH-20-EJ-6242 हा भाडे तत्त्वावर घेतला. सदरचा ट्रॅक्टर वाळू वरती चालू देण्यासाठी आरोपी क्र. 1 राहुल सुलाने यांने पंचासमक्ष तक्रारदारास 15,000/- रुपयांची लाचेची मागणी केली.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

सदर लाचेची रक्कम आरोपीला देण्यासाठी आरोपी क्र. 3 राहुल खैरे याने पंचासमक्ष तक्रारदार यास प्रोत्साहन दिले. आलोसे क्र 1 राहुल सुलाने याच्या सांगण्यावरून आलोसे क्र. 2 विठ्ठल राठोड याने लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असून त्याला रंगेहात पडण्यात आलेले आहे. आलोसे क्र. 1 व 2 यांना ताब्यात घेतले असून सिल्लोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ए.सी.बी. छत्रपती संभाजीनगर , मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ए.सी.बी. छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – शंकर म. मुटेकर पोलीस निरीक्षक, ए.सी.बी. जालना, सापळा पथक -पोलीस अंमलदार गजानन कांबळे, गजानन खरात, अतिश तिडके, विठ्ठल कापसे यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!