क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

करमाड ते पिंप्री रोडवर हॉटेल जगदंबा जवळ गावठी कट्टा घेवून फिरणारा बीडचा युवक जेरबंद !

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ – गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस घेवून फिरणा-याला शिताफिने जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखा व करमाड पोलिसांनी ही संयुक्तीक कारवाई केली. करमाड ते पिंप्री रोडवर ही कारवाई करण्यात आली. बाबासाहेब अशोक वारकरी (वय २५ वर्षे रा. कात्रापूर ता. धारूर जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे.

मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील अवैध धंद्यावर कारवाईचे धाड सत्र सुरू केले असून त्या अनुषंगाने दिनांक २३/०४/२०२४ रोजी सतिष वाघ, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे जबरी चोरी विरोधी पथक हे करमाड परिसरात अवैध धंद्या बाबत माहिती घेवून कारवाई करण्यासाठी पाठविले होते.

यावेळी पथकातील पो.उप.नि. भगतसिंग दुल्हत यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली कि, करमाड ते पिंप्री रोडवर हॉटेल जगदंबाच्या अलिकडे मंगरूळ फाटा जवळ एक व्यक्ती हा मंगरूळ ला त्याचे नातेवाईकाकडे जाण्यासाठी थांबला असुन त्याने कमरेला गावठी कट्टा बाळगुन आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

यामाहितीच्या आधारे पो. उपनि. भगतसिंग दुल्हत व करमाड पोस्टेचे प्रभारी अधिकारी प्रताप नवघरे यांनी तात्काळ मंगरूळ फाटयाचे दिशेन पथकासह गेले असता तेथे त्यांना संशयीत हा मंगरूळला जाण्यासाठी उभा असलेला पोलीसांचे नजरेस पडला. त्याचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून तो बेसावध असताना अचानक त्याचेवर झडप घालून त्यास ताब्यात घेतले.

यावेळी त्याला विश्वासात घेवून त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बाबासाहेब अशोक वारकरी (वय २५ वर्षे रा. कात्रापूर ता. धारूर जि. बीड) असे सांगितले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेला लपवलेली एक काळया रंगाची मुठ असलेली गावठी कट्टा अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळून आला. सदर गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकूण ३१,०००/- मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुध्द पोलीस ठाणे करमाड येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाड पोलीस करीत आहे.

नमुद कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, पूजा नांगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सतिष वाघ, पोलीस निरीक्षक, प्रताप नवघरे, सहा. पोलीस निरीक्षक, करमाड तसेच स्थागुशाचे भगतसिंग दुल्हत, पो.उप.नि. पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, दीपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, संजय तांदळे, योगेश तरमाळे, सुनिल गोरे (करमाड) यांनी केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!