जाधववाडीत 7 एकर जमिनीवर अत्याधुनिक बस डेपो ! 250 बसेसची क्षमता, 50 इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग सुविधा !!
छत्रपती संभाजीनगर, दि. ४ -: स्मार्ट सिटी अंतर्गत जाधववाडी येथे तयार होत असलेल्या बस डेपोची पाहणी करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी कंडक्टर ड्रायव्हरसाठी स्वच्छतागृह व इतर सुविधा व वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कमांड सेंटर सबंधित सूचना दिल्या.
स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जाधववाडी येथे 7 एकर जमिनीवर अत्याधुनिक बस डेपो तयार करण्यात येत आहे. या बस डेपोची क्षमता 250 बसेसची आहे. सोबतच येथे 50 इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग सुविधा असणार आहे. हा डेपो माझी स्मार्ट बस सेवेसाठी अत्यंत गरजेची असून इथे बसेसची वॉशिंग, देखभाल, दुरुस्ती व पार्किंग असणार आहे. सोबतच बस विभागाची प्रशासकीय इमारत सुद्धा इथे तयार होत आहे. यामुळे बस सेवा सुरळीत व दीर्घकाळ सुरू ठेवण्यास मदत होईल. स्मार्ट सिटी तर्फे शहरात 35 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे शहराला पी एम इ बस सेवेअंतर्गत 100 इलेक्ट्रिक बस मंजूर झाले आहेत. डेपो तयार झाल्यानंतर या सर्व 135 बसेस शहरात सुरू करता येतील.
या महत्त्वाच्या प्रकल्पाची पाहणी करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटी चे सीईओ जी श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बस वाहक व चालक साठी व्यवस्थित स्वच्छतागृह व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यास सूचना दिल्या. माझी स्मार्ट बस सेवेसाठी बस ट्रॅकिंग, व मोबाईल ॲप व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र कमांड सेंटर उभारण्यासाठी सुद्धा आदेशित केले. प्रशासकांनी बस डेपो येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी यंत्रणा बसवण्याचे सांगितले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
यावेळेस स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, मनपा अतिरिक्त आयुक्त व स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर, शहर अभियंता ए बी देशमुख, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, किरण आढे, ऋषिकेश इंगळे, स्नेहा बक्षी, नेत्रप्रभा जाधव, प्रकल्प सल्लागार अजय ठाकूर, करण ठाकूर व अन्य उपस्थित होते. नवीन बस डेपो येथे फेब्रुवारी अखेरपर्यंत कामकाज सुरू करता येईल, अशे अधिकाऱ्यांनी सांगितले.