पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंत्याच्या घरी सापडलं मोठ घबाड ! रोख, दागिने अन् तीन किलो चांदी !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २३ : भ्रष्टाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आरोपी राजेश आनंदराव सलगरकर, कार्यकारी अभियंता माजलगाव पाटबंधारे विभाग,परळी त्यांचे आनंद नगर गंगणे यांचे घरी गजानन बिल्डिंग येथील किरायाचे राहते घरी छापा टाकला असता मोठं घबाड मिळालं.
पोलीस स्टेशन परळी शहर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील राजेश आनंदराव सलगरकर, कार्यकारी अभियंता मुख्य आरोपी आहेत. त्यांच्या घरी गजानन बिल्डिंग येथील किरायाचे राहते घरी दिनांक 22/5/2024 रोजी आरोपी लोकसेवक व पंचा समक्ष घर झडती घेतली घर झडतीमध्ये पुढील प्रमाणे मुददेमाल मिळून आला
1)रोख रक्कम : 1178465/- रुपये
2)सोने : दागिणे एकूण 30 ग्रॅम किंमत अंदाजे 210000 रुपये
3) चांदी : एकूण 3 किलो 400 ग्रॅम किंमत अंदाजे 2,72,000 रुपये
रोख रक्कम व सोने चांदीचे दागिणे मिळून आले आहेत. सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुण ताब्यात घेण्यात आला आहे. घरझडती पथक — पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड,अंमलदार सुरेश सांगळे,सुदर्शन निकाळजे, स्नेहलकुमार कोरडे,गणेश मेहेत्रे, ही कारावई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक,ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe