महाराष्ट्र

वैद्यकीय आरोग्य सेवा गट ब संवर्गाची अंतरिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द ! वशीलाबाजी चालल्यास एका महिन्याचा आत आक्षेप नोंदवता येणार !!

मुंबई, दि. १४ : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट-ब संवर्गामध्ये बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक पथके, आयुर्वेदिक दवाखाने, कारागृह यांचे आस्थापनेवर कार्यरत आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट ब संवर्गामध्ये एकूण १२८५ पदे मंजूर असून १०४७ पदे भरलेली आहेत व २३८ पदे रिक्त आहेत. या संवर्गाची अंतरीम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्येष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आरोग्य मंत्री यांच्या पाठपुराव्यामुळे प्रलंबित ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

संवर्गातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांची दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजीची अंतरिम ज्येष्ठता सूची शासन परिपत्रकानुसार दिनांक ११ डिसेंबर २०२३ अन्वये प्रसिदध करण्यात आलेली आहे. ज्येष्ठतासूची बाबत काही आक्षेप असल्यास १ महिन्याच्या आत सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. मुदतीअंती अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्यात येणार आहे.

अस्थायी वैद्यकीय अधिकारी यांचे नियमित महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट-ब या संवर्गात सन २०१९ मध्ये समावेशन करण्यात आले होते. तेव्हापासून जेष्ठतासूची प्रसिध्द झाली नव्हती. जेष्ठतासूची वैद्यकीय अधिकारी गट-ब यांचे समावेश करण्यात आल्यानंतर प्रथमच प्रसिध्द करण्यात आलेली आहे. जेष्ठतासूची प्रसिध्द केल्यामुळे संवर्गातील वैद्यकीय अधिकारी यांच्या पदोन्नती व इतर सेवाविषयक बाबीची पूर्तता व निपटारा करणे सुलभ होणार आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!