कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा, ज्यांना क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्या, या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार ? जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका
मुंबई, दि. २० – सारासार विचार करता, कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा होते. असे असताना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकूमशाही आहे. ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे; त्यांना थांबवता कशाला ? या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार असल्याची सांगून राज्य सरकारच्या निर्णयावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली.
यासंदर्भात, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले की, असे समजते की, १६ वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्याला यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही. कारण की, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच, कोणी कोचिंग क्लासेस घेतल्यास त्यांना १ लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये पाठवून त्यांचा जादा अभ्यास करून घेण्याची पालक – शिक्षकांची मानसिकता असते. कोचिंग क्लासेस हे नोकरदार आई, वडील- पालकांनाही साह्यभूत ठरत आलेले आहेत. सारासार विचार करता, कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा होते. असे असताना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकूमशाही आहे. ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे; त्यांना थांबवता कशाला ? या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार आहे, याचा अंदाजच न केलेला बरा ! मध्यंतरी घरगुती ट्यूशन्स बंद केल्या होत्या. इथपर्यंत यांची मजल जाईल की म्हणतील, आता घरातच रहा!, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe