ताज्या बातम्यामहाराष्ट्र
Trending

तत्कालीन संपादक प्रशांत दीक्षित, साक्षिदार मार्टीन पुज्जेकरला कोर्टाची चपराक ! चौकशीला समोरे न जाणारे पळपुटे तक्रारदार दीपक पटवेंचे आरोप निराधार व बिनबुडाचे, वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळेंनी कोर्टात जोरदार युक्तीवाद करून स्वत: लढली केस; सत्यमेव जयते..!!

मा. औद्योगीक न्यायालयाचे लॅंडमार्क जजमेंट

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ -: दिव्य मराठीचा साडेतीन कोटींचा पीएफ घोटाळा उघडकीस आणणाऱ्या वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे यांना षडयंत्र रचून खोट्या चार्जेसमध्ये अडकवणाऱ्या चौकडीचा बुरखा मा. कोर्टाने टराटरा फाडला. दैनिक दिव्य मराठीचे तत्कालीन संपादक प्रशांत दीक्षित, साक्षिदार मार्टीन पुज्जेकरला कोर्टाची चांगलीच चपराक बसली आहे. आरोप करून चौकशीला समोरे न जाणारे  पळपुटे तक्रारदार दीपक पटवे (तत्कालीन निवासी संपादक) यांच्या तक्रारून लावलेले चार्जेस निराधार व बिनबुडाचे असल्याचे कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत. वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे यांनी कोर्टात जोरदार युक्तीवाद करून त्यांनी स्वत:च ही केस लढली. सत्यमेव जयते..!!

थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे यांनी दिव्य मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात पीएफ घोटाळा असल्याचे उघडकीस आणले. प्रोव्हिडंट फंडाच्या कोर्टात वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे यांनी ही केस स्वतहा लढली. याप्रकरणाचा निकाल सुधीर जगदाळे यांच्या बाजुने लागला. तब्बल साडेतीन कोटींचा घोटाळा असल्याचा आदेश प्रोव्हिडंट फंडाच्या मा. आयुक्तांनी दिला. दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेल्या मजिठिया वेतन आयोगाचा रिकव्हरीचा दावाही वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे व टीमने मा. कामगार न्यायालयातून जिंकला. आता हे प्रकरण मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून सर्वांच्या एरिअर्सची सुमारे १ कोटी व पीएफचे सुमारे पाऊन कोटी मा. उच्च न्यायालय व पीएफ कार्यालयात सुरक्षित जमा आहे.

दरम्यान, पीएफचा घोटाळा, मजिठिया वेतन आयोगाचे लाभ मागितले म्हणून व काही जणांचा भंडाफोड केला म्हणून वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे यांच्यावर खोटे, निराधार, बिनबुडाचे चार्जेस लावण्यात आले. व्यवस्थापनाची चाटूगिरी करणारे यात काही जण आघाडीवर होते. या प्रकरणाला वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे यांनी मा. कोर्टात आव्हान दिले. मा. औद्योगीक न्यायालयाने या प्रकरणात दैनिक दिव्य मराठीच्या व्यवस्थापनाला जोरदार दणका दिला आहे. चौकशी अधिकाऱ्याने दिलेल्या चौकशी अहवालातील निष्कर्ष हे पूर्णत: विकृत (perverse) असल्याचा आदेश मा. कोर्टाने दिला आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तत्कालीन संपादक प्रशांत दीक्षित, तक्रारदार निवासी संपादक दीपक पटवे व साक्षिदार मार्टीन पुज्जेकर यांचा खोटारडेपणाचा बुरखा टराटरा फाडला. साक्षिदार मार्टीन पुज्जेकर याने दिलेली साक्ष विश्वसनीय, विश्वासार्ह (reliable or trustworthy) नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण मा. कोर्टाने नोंदवले आहे. याशिवाय निवासी संपादक दीपक पटवे यांनी तक्रार केली खरी मात्र ते चौकशी समोर आलेच नाही. तत्कालीन संपादक प्रशांत दीक्षित यांनी बजावलेल्या शो कॉजमधील आरोपही निराधार, बिनबुडाचे असल्याचे कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. एकंदरीतच निराधार, बिनबुडाच्या चार्जेसवर आधारीत चौकशी अधिकाऱ्याने काढलेले निष्कर्ष व अहवालही मा. न्यायालयाने रद्द केला आहे.

वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे यांनी ही केस स्वत: लढली. रात्र रात्र जागून त्यांनी वर्कींग जर्नलिस्ट अॅक्ट, मजिठिया वेतन आयोग, प्रोव्हिडंट फंड व लेबर लॉ चा अभ्यास केला. यासाठी त्यांनी माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही हवाला दिला. डीबी कॉर्पचे वकील व वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे यांच्यात युक्तीवादाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून मा. कोर्टाने आदेश पारित केला. निराधार, बिनबुडाच्या चार्जेसवर आधारीत चौकशी अधिकार्याने काढलेले निष्कर्ष व अहवाल मा. न्यायालयाने रद्द करून वरिष्ठ पत्रकार सुधीर जगदाळे यांना खोट्या चार्जसमधून मुक्त केले.

झूठ को सत्य बनाया नहीं जा सकता,
उगते हुए सूरज को छुपाया नहीं जा सकता,
लाख कोशिश कर ले सारी दुनिया
लेकिन सत्य को दबाया नहीं जा सकता…
सत्यमेव जयते…

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!