ताज्या बातम्यामराठवाडामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर शहरात आज हेरिटेज मॅरेथॉन, काही रस्त्यावरील एका बाजुची वाहतूक काही काळासाठी बंद !!

भास्कर मराठी, दि. १० – छत्रपती संभाजीनगर शहरात हेरिटेज मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याने आज, १० डिसेंबर रोजी शहरातील काही रस्त्यांवरील एका बाजुची वाहतूक बंद करण्यात आली असून रस्त्यावरील दुसर्या बाजुची वाहतूक मात्र सुरु राहणार आहे. सकाळी ६ ते १०.३० पर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

दिनांक १०/१२/२०२३ रोजी एम जी एम तर्फे हेरिटेज मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन एमजीएम स्टेडीयम गेट नंबर ७ येथून सुरु होऊन, रस्त्याच्या विरुध्द बाजुने सेन्ट्रल नाका, रस्त्याच्या विरुध्द बाजुने, आदर्श नागरी पतसंस्था, सेन्ट्रल नाका येथून रस्त्याच्या डाव्या बाजुने आय पी मेस,

टि.व्ही. सेन्टर चौक येथून रस्त्याच्या डाव्या बाजुने एन १२ विसर्जन विहीर, सलीमअली सरोवर, गणेश कॉलनी, चांदणे चौक, अण्णाभाऊ साठे चोक, रस्त्याच्या डाव्या बाजुने रंगीन दरवाजा, किलेअर्क, परत त्याच बाजुच्या रस्त्याने अण्णाभाऊ साठे चोक, अण्णाभाऊ साठे चौक येथून रस्त्याच्या विरुध्द बाजुने विभागीय आयुक्त कार्यालय टी, दिल्लीगेट, उध्दवराव पाटोल चौक,

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

उध्दवराव पाटील चौक येथून रस्त्याच्या विरुध्द बाजुने सत्यविष्णू हॉस्पिटल चौक, होमगार्ड कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक येथून रस्त्याच्या विरुध्द बाजुने टि.व्ही. सेन्टर चौक परत त्याच मार्गे एमजीएम स्टेडीएम येथे समारोप होणार आहे. सदर स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे स्पर्धा मार्गावर स्पर्धकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होऊन जनतेस अडथळा, धोका, गैरसोय होईल, स्पर्धा मार्गावरील वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे.

दिनांक १०/१२/२०२३ रोजीचे सकाळी ०६.०० ते १०.३० वाजेपर्यंत एमजीएम तर्फे आयोजित हेरिटेज मॅरेथॉनचे मार्गावरील रस्त्याची एक बाजु सर्व वाहतुकीस बंद करुन, दुसरी बाजु येणा-या व जाणान्या वाहतुकीसाठी सुरु ठेवण्यात येणार आहे.

बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील. अधिसुचना ही पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!