ग्रामसेवक लाचेच्या सापळ्यात अडकला, परवानगी देण्यासाठी घेतले पाच हजार !
छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ – ग्रामपंचायत कडून काही परवानगी देण्यासाठी ग्रामसेवकाला पाच हजरांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई शिवनेरी हॉटेल, अंबड चौफुली जालना येथे करण्यात आली.
लक्ष्मीनारायण नरसिंगराव येमुल (वय-50 वर्षे, पद- ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय, घोन्सी खुर्द ता.घनसावंगी जि. जालना ( वर्ग-3) रा. जयराज रेसिडेन्सी च्या पुढे भगवंत कॉलनी, जालना) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांना, त्यांचे मामाचे मुलाला आणि त्यांचे मित्राला मौजे घोन्सी खुर्द येथे घराचे बांधकाम करावयाचे असल्याने त्यासाठी त्यांना महिंद्रा हाउसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज घ्यायचे असल्याने ग्रामपंचायत कडून काही परवानगी घ्यायची असल्याने दि. 30.05.2024 रोजी आरोपी येमुल, ग्रामसेवक यांनी तक्रारदार, त्यांचे मामाचा मुलगा आणि मित्र असे तिघांचे प्रत्येकी 1500/- रू याप्रमाणे 4,500/- रू लाचेची आणि वर खर्चाला काही पैसे असे एकूण 5000/- रुपयांची मागणी केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्यानंतर शिवनेरी हॉटेल, अंबड चौफुली जालना येथे पंचासमक्ष 5000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून आलोसे लक्ष्मीनारायण येमुल, ग्रामसेवक यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन कदीम जालना ज़ि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो. छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी – किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना, सापळा अधिकारी- सुजित बडे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक- पोलीस अंमलदार शिवानंद खुळे, जावेद शेख, कृष्णा देठे, शिवाजी जमधडे, गणेश बुजाडे, संदीप लहाने अँटी करप्शन ब्युरो ,जालना यांनी पार पाडली.