क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

छत्रपती संभाजीनगरातील महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि काडी लावली ! परतूर रेल्वेस्टेशनवरील खळबळजनक घटना, तू मलाच पहायला येते म्हणून पडली वादाची ठिणगी !!

परतूरच्या सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Story Highlights
  • जवळच असलेल्या २० ते ३० लोकांनी आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ -: छत्रपती संभाजीनगरातील महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि काडी लावली. जवळच असलेल्या २० ते ३० लोकांनी आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना परतूर रेल्वेस्टेशनवर घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी परतूरच्या सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तू मलाच पहायला येते म्हणून दोन्ही महिलेमध्ये वाद झाला आणि नंतर वादाचे रुपांतर अंगावर पेट्रोल टाकण्यापर्यंत झाले.

आगित जखमी झालेली महिला ही राजीव नगर जहांगीरदार कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथील आहे. घाटीत दाखल असताना पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, छत्रपती संभाजीनगर येथील महिलेची मुलगी परतूर येथे राहते. तिचे साईनगरमध्ये घर आहे. तिची तब्येत बरी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून तिची आई या तिच्याकडे राहण्यासाठी गेली होती. सदर महिलेची अजून एक नातेवाईक परतुरमध्ये राहते. तिला गेल्या शनिवार कुत्रा चावला. तिला घेवून त्या परतूर सरकारी दवाखान्यात गेल्या. त्या दवाखान्यात महिला कर्मचारी होती. तिला कुत्रा चावल्याचे इंजेक्शन मागितले असता ती म्हणाली की, तू मला पाहायला येते. यावरून शिविगाळ झाली.

दरम्यान, दोन दिवसाआड इंजेक्शन द्यायला सांगितले होते म्हणून दि. 10/04/2024 रोजी दुपारी 01:00 वाजेच्या दरम्यान दवाखान्यात घेवून गेले. सदर महिला कर्मचारी पुन्हा त्याच कारणावरुन तू मला पाहायला येते यावरून भांडली आणि तू संध्याकाळी परत ये असे म्हणाली. त्यावरून पुन्हा संध्याकाळी 09:00 वाजेच्या दरम्यान दवाखान्यात गेले. दवाखान्यात त्यांचे पुन्हा भांडण झाले. त्यानंतर रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान घरी येणेकरिता (छत्रपती संभाजीनगरला) परतुर रेल्वे स्टेशनवर आली असता, सदर कर्मचारी महिला पाठीमागे आली,

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तिला पाहून ब्रिजच्या पाठीमागे लपली. तिने पाठीमागून येवून अंगावर पेट्रोल टाकले आणि काडी लावली. अचानक जाळ झाला. सदर कर्मचारी महिला अंधारातून पळून गेली. तेथे अंदाजे वीस, तीस लोक होते त्यांनी पाणी टाकून आग विझवली. त्यांनतर लोकांनीच जखमी महिलेला परतुर सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथून नातेवाईकांनी जालना व नंतर छत्रपती संभाजीनगर येथे उपचारा करिता दाखल केले. याप्रकरणी परतूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!