क्राईमताज्या बातम्या
Trending

गुन्हे शाखेच्या पोलिस अमंलदाराला फायटरने मारहाण ! मधुरा लॉन्ससमोर किया सेल्टॉस आडवी लावून गळा दाबला व फायटरने ठोसा मारला !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ – मधुरा लॉन्ससमोर किया सेल्टॉस आडवी लावून एकाने गळा दाबला दुसऱ्याने फायटरने ठोसा मारला. गुन्हे शाखेच्या पोलिसासा मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अजिंठा रोडवलील हर्सूल येथील मधुरा लॉन्ससमोर ही घटना घडली.

काकासाहेब कौतिकराव आधाने (वय 34 वर्ष व्यवसाय नौकरी, पोअं, गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर रा. कोलठाण ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. काकासाहेब आधाने यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, युनायटेड सिग्मा इन्स्टिट्युड ऑफ मेडिकल सायन्सेस प्रा.लि. हॉस्पिटल मध्ये औषधोपचार दरम्यान जखमी काकासाहेब आधाने यांनी दिलेला जवाब असा, ते गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर शहर येथे पोउपनि बोडखे यांच्या पथकात काम करतात.

दि. 20/04/2024 रोजी पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने यांची सकाळी 09.00ते 15.00 वाजेपर्यंत पथकासोबत ड्यूटी होती. पुडंलीकनगर पोस्टे ह‌द्दीमध्ये दारुबंदी काय‌द्याअंतर्गत छापा मारुन फिर्यादीवरून पोस्टे पुंडलिकनगर येथे गुन्हा दाखल करुन रात्रपाळी ड्युटी असल्याने निवास्थानी जात होते. दरम्यान, पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने हे हर्सूल येथील मधुरा लॉन्स येथे असताना १५.३० वाजता पांढ-या रंगाची किया सेलटॉस गाडी (MH 20 FP 2823) पुढे घेण्याच्या कारणावरुन सदर वाहन चालकाने त्याचे वाहन पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने यांच्या गाडीला आडवे लावले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने यांना शिविगाळ करून गाडीतील एका जणाने त्याच्या हातातील फायटरने जोराने दोन तीन वेळा ठोसा मारून पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने यांना जखमी केले. त्यामुळे पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने यांच्या डाव्या डोक्याला जखम होवून सुज आली. त्यापैकी दुस-याने पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने यांचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाठीमागून रस्त्याने येणा-या वाहन चालक व रिक्षा चालकाने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने यांचा गळा दाबणा-या व्यक्तीने त्याचा साथीदार यास आजीनाथ नावाने हाक मारून ते गाडीत बसून सदर ठिकाणावरून पळून गेले. दरम्यान, पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने यांना एका जणाने घाटीत दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार होवून नंतर सिग्मा हॉस्पिटल येथे पुढील उपचारकामी दाखल करण्यात आले.

याप्रकरणी जखमी पोलिस अंमलदार काकासाहेब आधाने यांच्या फिर्यादीवरून MH 20 FP 2823 या क्रमांकाड्या किया सेल्टॉस गाडीचा चालक व त्याचा साथीदार अशा दोघांवर हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हर्सूल पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!