व्याजाचे पैसे आत्ताच दे म्हणून सैन्यातील निवृत्ताच्या पत्नी व मुलास मारहाण ! सारी गल्ली जमा झाली एकानेही भांडण सोडवले नाही !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २४- व्याजाचे पैसे आत्ताच दे म्हणून सैन्यातील निवृत्ताच्या पत्नी व मुलांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची तक्रार छावणी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. हा प्रकार पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत झाला. व्याजाच्या पैशांवरून सुरु असलेला वाद भांडणावेळी गल्ली जमा झाली मात्र एकानेही भांडण सोडवले नसल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
माजी सैनिक कॉलनी (पडेगाव छत्रपती संभाजीनगर) महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे पती हे मिल्ट्री रिटायर्ड असून आजारी आहे. फिर्यादी महिलेने एका महिलेकडून एका वर्षापूर्वी चाळीस हजार रुपये व्याजाने घेतले होते. दिनांक 23/01/2024 रोजी दुपारी 01.30 वाजेच्या सुमारास फिर्यदी महिलेच्या राहते घरासमोर माजी सैनिक कॉलनी येथे सदर महिलेने व्याजाचे पैसे आत्ताच दे म्हणाली.
यावर फिर्यदी महिलेने 5 फेब्रुवारीला देते असे तिला सांगितले. यावरून त्या महिलेने शिव्या देण्यास सुरुवात केली. फिर्यीद महिलेचा मुलगा व मुलगी समजावण्यास आले असता त्यांनाही मोठ्याने शिव्या व मारहाण केली. मुलीच्या डोक्याला हाताला किरकोळ मार लागला तसेच मुलाच्या कपाळावर पाठीवर मारहाण करून जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली. सदर भांडणे झाले तेव्हा गल्लीतील लोक जमा झाले परंतु भांडण कोणी सोडवले नसल्याचे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून परमजीत जगदीश संगर (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.