क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

तलाठी व एजंट लाचेच्या जाळ्यात: वाळू ट्रक्टरवर कारवाई न करण्यासाठी एजंटला ८ हजार घेताना रंगेहात पकडले !

छत्रपती संभाजीनगर, दि. ८- तलाठी व त्याचा पंटर एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. वाळूच्या ट्रक्टरवर कारवाई न करण्यासाठी एजंटला ८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी तलाठीने लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

1) सुरज सिंग त्रिंबक सिंग राजपूत , वय 40 वर्ष , व्यवसाय नोकरी, पद तलाठी, (वर्ग 3)* नेमणूक – उपविभागीय कार्यालय पैठण जिल्हा संभाजीनगर राहणार विना सोसायटी,जटवाडा रोड, छत्रपती संभाजी नगर, 2) संभाजीराव नंदू शिंदे, वय 30 वर्ष, व्यवसाय शेती व चालक, राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक 3/2/2024 रोजी आरोपी तलाठी सुरज सिंग राजपूत यांना खाम नदीवर तक्रारदार यांचे पाणी भरण्याचे व वाळू धुवून देण्याचे ट्रॅक्टर आढळून आले. त्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मध्यस्थी खाजगी व्यक्ती संभाजीराव नंदू शिंदे यांच्या मदतीने तक्रारदाराकडे 10000/- रुपये दरमहा हप्ता बक्षीस म्हणून लाच मागितली. त्याप्रमाणे दि.7/2/2024रोजी मध्यस्थी संभाजी शिंदे यांनी तक्रारदारास पंचासमक्ष लोकसेवकाकरीता लाच मागून व तडजोड करून 8000/- रुपये लाच मागितली व लोकसेवकाशी समक्ष बोलणे करून दिले तेव्हा लोकसेवकाने त्या गोष्टीस प्रोत्साहन दिले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

त्यानंतर मध्यस्थी खाजगी व्यक्ती संभाजीराव शिंदे याने पंचासमक्ष 8000/- रुपये लाच रक्कम स्वीकारली, त्यास रंगेहाथ पकडण्यात आले असून पो.स्टे.बिडकीन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव , अपर पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, सापळा अधिकारी – राहुल फुला, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोना राजेंद्र सिनकर ,चा. पो. अं, चांगदेव बागुल यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!