हर्सूलमध्ये वॉशिंग सेंटरचे काम करणाऱ्या व्यक्तीच्या हिमायत बागेतील घरात चोरी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले !
छत्रपती संभाजीनगर, दि. २० – हर्सूलमध्ये वॉशिंग सेंटरचे काम करणाऱ्या व्यक्तीच्या हिमायत बागेतील घरात चोरी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले. घरातून गोणी भरून चोरी करत असताना घरमालक आल्याने त्याने या चोरट्यांना पकडले. त्यानंतर आजुबाजुच्या लोकांनी पोलिसांना बोलावले व त्यांच्या हवाली केले.
शेख मोसिन नसिरोउद्दीन (वय 35 वर्षे, धंदा वॉशिग सेंटर रा. हर्सूल गाव, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते हर्सूल गाव मेन रोडवर वॉशिग सेंटरचे काम करतात. दि. 15/04/2024 रोजी शेख मोसिन नसिरोउद्दीन हे परिवारासह जुन्या घरी राहण्यासाठी गेले होते. दिनांक 18/04/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता शेख मोसिन नसिरोउद्दीन हे दुसर्या घरी चाऊस कॉलनीच्या पाठीमागे हिमायत बाग येथे गेले असता जाताना हर्सूलमधील घराच्या दरवाजाला लॉक लावून गेले होते.
दरम्यान, त्यांच्या घरात दोन जण शेख मोसिन नसिरोउद्दीन यांना बघून पळून जात होते. त्यांना शेख मोसिन नसिरोउद्दीन यांनी पकडले. त्यांच्याजवळ गोण्यामध्ये घरातील चिल्लर सामान होते. घरातील एका किचन मधील भांडे व अन्य सामान दिसून आले नाही. बाकीचे सामान कोठे आहे, हे ते मला काही एक सांगत नव्हते. आजुला बाजुला वॉकिगला येणारे जाणारे यांनी आवाजावरुन घरात आले व त्यांनी डायल 112 कॉल केला असता तेथे काही वेळात डायल 112 मोबाईल हजर झाली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्या दोघांना विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे 1) अमजद खान सलीम खान वय 26 वर्ष रा. जलाल कॉलनी २) इम्रान खान जलील खान वय 35 वर्ष रा. जलाल कॉलनी असे सांगितले. नंतर त्या दोघांना पोलिस स्टेशनमध्ये घेवून गेले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.