पोलिसाला वाळू माफियाची धक्काबुक्की, चालत्या हायवामधील वाळू भररस्त्यात खाली करून पसार ! बदनापूर तालुक्यातील सोमठाणा ते दाभाडी रस्त्यावरील धक्कादायक प्रकार !!
छत्रपती संभाजीनगर, दि. ३१- गिरीजा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना हायवा बदनापूर पोलिस स्टेशनला घेवून जात असताना पोलिसाला धक्काबुक्की करून चालत्या हायवामधील वाळू भररस्त्यावर खाली करून हायवासह चालक पसार झाला. ही घटना बदनापूर तालुक्यातील सोमठाणा ते दाभाडी रस्त्यावर घडला.
बदनापूर पोलिस स्टेशनचे पो.कॉ. पुनमसिंग गोलवाल यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 29.01.2024 रोजी पोलिस पथक सरकारी जिपने पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दुपारी 15.30 वाजेच्या सुमारास सोमठाणा ते दाभाडी रस्त्यावर विल्हाडी फाटा येथे एक पिवळ्या रंगाचा रेतीने भरलेला हायवा मिळून आल्याने पोलिसांनी त्याला हात दाखवला.
चालकाने गाडी थांबवली. त्याने त्याचे नाव गणेश दगडु पवार असे सांगितले. हायवा मालकाचे नाव व हायवाचा नंबर विचारला असता त्याने मालकाचे नाव अमोल कृष्णा शिंदे (रा वरुडी ता. बदनापूर) असे सांगून हायवा क्र MH-21CB9250 असा असल्याचे सांगितले. हायवा चालकास रेतीच्या रॉयल्टी बाबत विचारणा केली असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. सदर हायवा चालकाने हायवामधील रेती गिरीजा नदी पात्रातून अवैधरीत्या विनापरवाना चोरून आणलेली असल्याचे पोलिसांना कळले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्यामुळे पोलिसांनी सदर हायवा बदनापूर पोलिस स्टेशनला घेवून चल असे त्यास सांगितले. पो.कॉ. पुनमसिंग गोलवाल हे स्वतः हायवामध्ये बसून सदर हायवा पोलिस स्टेशनला घेवून येत असताना हायवा चालक गणेश पवार याने म्हसला पाटीवर अचानक हायवा चालु असताना हायवा मधील रेती रोडवर खाली केली. पोलिसांनी त्यास हायवामधील रेती खाली करु नको असे सांगितले. हायवा थांबवण्यास सांगितले असता त्याने हायवा रोडवर उभा करून पो.कॉ. पुनमसिंग गोलवाल यांना धक्का-बुक्की करून हायवाच्या खाली उतरून दिले व हायवा भरधाव घेवून पळून गेला.
याप्रकरणी पो.कॉ. पुनमसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक गणेश दगडु पवार (रा चौधरी कॉलनी चिखलठाणा) व हायवा मालक अमोल कृष्णा शिंदे व राधाकिशन आत्माराम शिंदे (दोन्ही रा. वरुडी) यांच्यावर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.