क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

18 लाखांचे पॅकेज, मोठी नौकरी असल्याचे सांगून उरकला विवाह ! शिक्षणाबाबत खोटे दस्तावेज तयार करून युवतीची फसवणूक केल्याची तक्रार !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ – 18 लाखांचे पॅकेज, मोठी नौकरी असल्याचे सांगून विवाह केला. शिक्षणाबाबत खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक करून विवाह केल्याची तक्रार युवतीने पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी युवक व त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी यांनी संगणमत करून यातील फिर्यादी यांचा पती हा उच्चशिक्षित आहे. तो मोठ्या नोकरीवर आहे. 18 लाखांचे पॅकेज आहे. असे खोटे सांगून यातील आरोपी याने व इतर आरोपीतांनी आरोपी नामे पियुष मसाळकर याचे शिक्षणाबाबत खोटे दस्तावेज तयार करून ते फिर्यादी, फिर्यादी कडील लोकांना दाखवून त्यांची दिशाभूल करून सदरचे लग्न करून फिर्यादी यांचा विश्वासघात करून फसवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

याप्रकरणी सदर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून 1) पीयुष प्रदीप मसाळकर, बय 26 वर्ष, 2) प्रदीप बंसतराव मसाळकर, वय 56 वर्ष, 3) महिला, 4) सुदर्शन टोपरे, वय 78 वर्ष, 5) महिला. 6) महिला, 7) गिरीष सुदर्शन टोपरे, 8) योगेश थेरे, 9) महिला, 10) धीरज सुदर्शन टोपरे, ११) महिला, १२) विजयराव वाकेकर, १३) महिला यांच्यावर पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये 142/2024 कलम – 420, 471, 465,468, 406,504, 506,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोउपनि आनंद वनसोडे करीत आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!