क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

फुलंब्री तालुक्यातील धानोरा, सुलतानवाडीत वीज चोरी करणाऱ्या ९ जणांवर गुन्हा !

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 – म.रा.वि.वि.कंपनीच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून चोरून वीजवापर करणार्या फुलंब्री तालुक्यातील ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे चोरून वीज वापरणार्यांचे धाबे दणाणले आहे.

मिथुन भाऊराव पवार (वय 36 वर्षे व्यावसाय नोकरी रा. फुलंब्री ग्रामीण शाखा येथे सहाय्यक अभियंता) यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 04.12.2023 व दि. 04.01.2024 रोजी सकाळी 08.00 वाजेच्या सुमरास मौजे धानोरा व सुलतानवाडी (ता. फुलंब्री जि.छ. संभाजीनगर) या गावातील काही व्यक्ती जवळच्या म.रा.वि.वि.कंपनीच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून चोरून वीजवापर करत असताना दिसून आल्या. मुख्य अभियंता यांनी प्रत्येक महिन्याच्या तीन दिवस वीज चोरीवर आळा घालण्याच्या उ‌द्देशाने वीजचोरी पकडण्याची विशेष मोहीम घेण्याचे तोंडी आदेश दिले होते.

मागील १२ महिन्यापासून अनधिकृतपणे चोरून वीजवापर करत असल्याचे निदर्शनास आले. अनाधिकृतपणे लघुदाब वाहिनीच्या तारावर आकडा टाकून घरासाठी वीजवापर ही वीजचोरी असून ते विद्युत कायदा २००३ च्या १३५ नुसार गुन्हा आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १५१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार सहाय्यक अभियंता मिथून पवार यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

1. उमर लाल शहा, धानोरा,

2. अशोक कोंडीबा साळुंके, धानोरा,

3. जनार्धन मुरलीधर साळुंके, धानोरा,

4. काशिनाथ दादा शिंदे, सुलतानवाडी,

5. बाबासाहेब दादा शिंदे, सुलतानवाडी,

6. अशोक सुपडाजी बकले, सुलतानवाडी,

7. दीपक अण्णा बकले, सुलतानवाडी,

8. अरुण लाला गाडेकर, सुलतानवाडी,

9. साहेबराव सांडू शिंदे, सुलतानवाडी यांच्यावर चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!