क्राईमताज्या बातम्यामराठवाडा

बीड: तलाठी भरतीतील घोटाळे बाहेर काढणाऱ्या बेरोजगार तरुणांवर गुन्हा ! चोर सोडून संन्याशाला फाशी, बेरोजगार तरुणांमधून संतापाची लाट !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १७- तलाठी भरतीतील घोटाळे बाहेर काढणाऱ्या बेरोजगार तरुणांवर गुन्हा दाखल केल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशी संतप्त प्रतिक्रिया बेरोजगार तरुणांमधून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून सरकारने जबाबदारीचे भान राखावे, गैरप्रकारांचे जे जे पुरावे समोर आहेत, त्याची चौकशी करावी, गुन्हेगारांना पाठीशी घालू नये, सरकारच बेजबाबदारपणे वागणार असेल तर उमेदवारांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये धंनजय गुंदेकर, राहुल कांबळे, राहुल कवठेकर, सचिन टेंगळ व इतर १०० ते १२५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, नुकतीच घेण्यात आलेली तलाठी भरती रद्द करून सदरची तलाठी भरीती ही एम.पी.एस.सी मार्फत घेण्यात यावी या प्रमुख मागणी करीता छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड असा पायी मोर्चा काढण्यात आला. सदरचा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर आल्या नंतर मोर्चात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्य रस्त्यावर येवून तिव्र स्वरुपात निदर्शने करीत सर्वजनिक रस्ता बंद करून रहदारीस अडथळा केला. सदर अंदोलनात सहभगी असलेले 01) धंनजय गुंदेकर 02) राहुल कांबळे 03) राहुल कवठेकर 04) सचिन टेंगळ यांनी वारंवार माईक वर अलाऊंसिंग करुन मोर्चा मधील 100 ते 125 विद्यार्थ्यांना धरणे आंदोलनास थांबण्यास सांगितले. व सदरचा मोर्चा 12.15 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर मुख्या रस्त्यावर थांबवून ठेवला.

पोलिस स्टेशन कडून देण्यात आलेल्या नियम अटीचे व बीड जिल्हयात जिल्हाधिकारी यांचे आदेश म.पो.का. कलम 1951 दि.11/01/2024 चे कलम 37 (1), (3) मुंबई पोलीस कायदा प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश चालू असताना सदर आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, तलाठी भरतीतील घोटाळे बाहेर काढणाऱ्या बेरोजगार तरुणांवर गुन्हा दाखल केल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशी संतप्त प्रतिक्रिया बेरोजगार तरुणांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!