तलाठी १२ हजारांची लाच घेताना रंगेहात चतुर्भुज ! वाटणी पत्रानुसार जमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ – बारा हजारांची लाच घेताना महिला तलाठ्यास रंगेहात पकडण्यात आले. वाटणी पत्रानुसार जमीन नावावर करण्यासाठी लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही कारवाई जालना जिल्ह्यातील राजूर येथे करण्यात आली.
श्रीमती कल्पना पंजाबराव काळमेघ (वय-35वर्षे, धंदा-नोकरी, पद-तलाठी सजा चांदई एक्को तहसील कार्यालय भोकरदन जिल्हा जालना रा. घर न. 23 ,शिवाजी नगर , देऊळगाव राजा जिल्हा बुलढाना ( वर्ग-3)) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे मौजे चांदई एक्को शिवारात गट नंबर 215 मध्ये 1 हेक्टर 50 आर जमीन असून ती वाटणी पत्रानुसार त्यांची आई व स्वत:च्या नावावर करण्यासाठी यातील आरोपी तलाठी काळमेघ तलाठी सजा चांदई एक्को यांनी लाच पडताळणी कारवाई दरम्यान दिनांक 25.04.2024 रोजी पंचासमक्ष 20000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडांती 12000 रू.घेण्याचे मान्य केले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
दिनांक 25.04.2024 रोजी सापळा कारवाई दरम्यान राजुर येथे पंचासमक्ष 12000/- लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपी तलाठी काळमेघ यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन हसनाबाद, ज़िल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर, मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना, सहायक सापळा अधिकारी- सुजित बडे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना सापळा पथक- पोलीस अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे यांनी पार पाडली.