ताज्या बातम्यामराठवाडा

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेसंदर्भात मोठी बातमी : शिक्षक, कर्मचाऱ्यांना मिळाला परमंनट रिटायरमेंट नंबर !!

छत्रपती संभाजीनगर, दि.१९ -: १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वी ’डीसीपीएस’ तर आता ’नवीन पेन्शन योजना’ लागू करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २२५ शिक्षक या कर्मचाऱ्यांना ’परमंनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर’ प्राप्त झाला आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात शुक्रवारी (दि.१९) कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, कुलसचिव दिलीप भरड, प्र.वित्त व लेखाधिकारी डॉ.संजय कवडे, सामान्य प्रशासनाचे अधिकारी डॉ.वैâलास पाथ्रीकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, डॉ.बी.एन.डोळे, उपकुलसचिव डॉ.आय.आर.मंझा, डॉ.गणेश मंझा, माधव वागतकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

३१ ऑक्टोबर २००५ पर्यंत सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती योजना लागू आहे तर १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचा-यांना डिफाईन क्वाँट्रक्टच्युअल पेन्शन स्किम ’डीसीपीएस’ लागू होती डिसेंबर २०१४ पासून आता ’नवीन पेन्शन योजना’ लागू करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना ’परमंनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर’ अर्थात ’प्राण’ प्राप्त झाला असून त्याप्रमाणे त्यांना निवृत्ती वेतन मिळणार आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

यावेळी प्राथमिक स्वरुपात डॉ.भास्कर साठे, डॉ.एस.जी.शिंदे, योगेश थोरात, पंकज बेडसे, डॉ.मीरा शिंदे,रविंद्र खताळ, मनोज शेटे, अमोल शेळके आदींना ’प्राण’ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी दिलीप भरड यांना विद्यापीठाच्यावतीने निरोप देण्यात आला.

कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन श्री भरड यांना गौरविण्यात आले. यावेळी मा.कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी म्हणाले, गेल्या १८ दिवसात मला अनेक गोष्टी शिकता आल्या मराठवाडयाची संस्कृती ही आपलेपणा जतन करणारी आहे. या विद्यापीठात अनेक चांगल्या बाबी आहेत, असेही डॉ.गोसावी म्हणाले. तर विद्यापीठाच्या विकासासाठी व्यवस्थापन परिषदेतील सर्वजन सकारात्मक आहेत, असे डॉ.गजानन सानप म्हणाले. विद्यापीठातून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी आयुष्यभर जतन करु, असे दिलीप भरड म्हणाले. डॉ.वैâलास पाथ्रीकर यांनी प्रास्ताविक, संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर अनिल खामगांवकर यांनी आभार मानले.

 आता मी कोठेही काम करु शकतो : कुलगुरु
पुण्यात जो वाहन चालवू शकतो तो जगात कुठेही गाडी चालू शकतो असे म्हटले जाते. त्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जो यशस्वी प्रशासन चालवेल तो जगात कुठेही काम करु शकतो, असे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी म्हणाले. मराठवाड्यातील छोटीशी कारकिर्द देखील मोठा अनुभव देणारी ठरेल, अशा विश्वास डॉ.गोसावी यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!