पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सीईटीद्वारे प्रवेश, ५५ अभ्यासक्रमांसाठी उद्यापासून ऑनलाईन नोंदणी !
३ ते १४ जून दरम्यान प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर, दि.१४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरातील ५५ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण ५५ अभ्यासक्रमांसाठी १५ ते २५ मे दरम्यान ’ऑनलाईन’ नोंदणी करण्यात येणार असून ३ ते १४ जून दरम्यान प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे.
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील सर्व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश यावर्षी प्रवेशपूर्व परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहेत. या संदर्भात मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली. प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, समिती अध्यक्ष डॉ.सुरेश गायकवाड, पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव आय.आर.मंझा यांच्यासह सर्व समिती सदस्य प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्नशील आहेत.
प्रवेशासाठी नियमावली ठरविण्यात आली आहे. पदव्यूत्तर अभ्यासक्रमास विद्याथ्र्यांना प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठ सर्व शैक्षणिक विभाग निहाय विभागीय स्तरावर अभ्यासक्रमनिहाय ’सीईटी’ परीक्षा आयोजित करुन सीईटी परीक्षेचे संपादीत गुण / अॅडमिशन किंवा कला परीक्षा चाचणी व पदवी परीक्षेस विद्यार्थ्यांने तृतीय किंवा अंतिम वर्षाच्या ऐच्छिक विषयामध्ये प्राप्त केलेले गुणांच्या सरासरी नूसार गुणवत्तेप्रमाणे महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणानुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून सर्व पदव्यूत्तर अभ्यासक्रमास खालील प्रमाणे विनिर्दिष्टित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानूसार पात्र विद्याथ्र्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
विद्यार्थ्यांनी सीईटी परिक्षेमध्ये संपादीत केलेले एकूण गुण व पदवी परीक्षेच्या तृतीय किंवा अंतिम वर्षांच्या ऐच्छिक विषयामध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या सरासरी नुसार शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणाप्रमाणे उदा.५० गुण सीईटी परीक्षेचे व ५० टक्के गुण अंतिम वर्षांच्या ऐच्छिक विषयाचे ग्राह्य धरून गुणवत्तेनूसार अभ्यासक्रमाच्या निर्धारित प्रवेश क्षमतेप्रमाणे प्रवेशयादी घोषित करण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सीईटी परीक्षेकरिता विहित शुल्कासह प्राप्त झालेल्या आवेदन पत्रांची छाननी / तपासणी करुन सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांची विभागनिहाय वेळापत्रकानूसार विद्याशाखेनिहाय / विषयनिहाय आपल्या स्तरावरून सीईटी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी १५ ते २५ मे दरम्यान ऑनलाईन नोंदणी विद्याथ्र्यांना करता येईल. पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले विद्यार्थीही ’सीईटी’ देण्यास पात्र असणार आहेत.
५५ अभ्यासक्रमांना प्रवेश
पदव्यूत्तर विभाग पुढीलप्रमाणे – विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत येणारे २२ अभ्यासक्रम – एम.एस्सी – भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान, संख्याशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, एम.व्होक (इंडस्ट्रीयल ऑटोमेशन), एम.व्होक (ऑटोमेबाईल टेक्नॉलाजी), जैवरसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र / नॅनोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, रसायन तंत्रज्ञान, गोपिनाथराव मुंढे राष्ट्रीय ग्रामीण व विकास व संशोधन संस्था, रुरल टेक्नॉलॉजी, जैवविविधतेचे संवर्धन, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान (उपकेंद्र धाराशिव), सुक्ष्मजीवशास्त्र (उपवेंâद्र धाराशिव उपपरिसर), प्रिंटिंग टेक्नॉलॉजी,
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत चार अभ्यासक्रम – वाणिज्य (एम.कॉम), पर्यटन प्रशासन (एम.टी.ए), जल व भूमी व्यवस्थापन (एमएमएस),
मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत येणारे २० अभ्यासक्रम – एम.ए- मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दु, संस्कृत, पाली आणि बुध्दीझम, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, एम.ए.(महात्मा पुâले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा), इतिहास, आर्कालॉजी, एम.ए.लाईफ लॉग लर्निंग एक्सटेंशन, एम.ए.वुमेन स्टडीज, मास्टर ऑफ लॉ, एम.ए. मास्टर ऑफ रुरल स्टडीज इन सोसिओ कल्चर अॅण्ड पॉलिटिकल अॅजपेक्ट (एमएसआर),
एम.ए.मास्टर ऑफ रुरल स्टडीज इन इकोनॉमिक्स , बँविंâग ऑफ इंडस्ट्री, आतर-विद्याशाखीय विद्याशाखेअंतर्गत येणार अभ्यासक्रम – एम.ए- होम सायन्स, संगीत, एम.लिब (ग्रंथालय व माहितीशास्त्र), एम.ए.नाटयशास्त्र, एम.एस.डब्ल्यु (समाजकार्य), एम.एफ.ए (फाईन आर्ट), एम.ए.लिबरल आर्ट, एम.ए.योगा, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या या सर्व विभागासाठी ३ मे १४ जून या काळात ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.आय.आर.मंझा कक्षाधिकारी सविता कदम, अभिषेक कदम यांच्यासह सहकारी प्रयत्नशील आहेत.