ताज्या बातम्यामराठवाडा

विद्यापीठ, सर्व महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, श्री राम प्राणप्रतिष्ठानिमित्त सुट्टी !

छत्रपती संभाजीनगर, दि.२० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयांना सोमवारी दि.२२ रोजी श्री राम प्राणप्रतिष्ठानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या संदर्भात कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करण्यात आली आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळवण्यात येते की, संदर्भिय परिपत्रक क्र.२ अन्वये विद्यापीठातील व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी सन २०२४ या वर्षाकरिता सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर परिपत्रकात असेही नमूद करण्यात आले आहे की, सार्वजनिक सुट्टयामध्ये महाराष्ट्र शासनाने बदल केल्यास तो बदल व अतिरिक्त सुट्टया जाहीर केल्यास या सुट्टया विद्यापीठास व संलग्न महाविद्यालयांना लागू राहतील.

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि.१९-०१-२०२४ रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेप्रमाणे श्री राम प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सोमवार दि.२२-०१-२०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या उपरोक्त अधिसूचनेप्रमाणे सोमवारी दि.२२/०१/२०२४ रोजी श्री राम प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त विद्यापीठातील सर्व शैक्षणिक, प्रशासकीय विभाग व संलग्नित महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे डॉ.प्रशांत अमृतकर यांनी कळवले आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!