ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश पहिल्यांदाच ’समर्थ’ पोर्टलद्वारे ! विद्यार्थ्यांसाठी प्रवेश ते निकालापर्यंतची प्रक्रिया अधिक सुलभ होणार !!

 राष्ट्रीय मिशन अंतर्गत विकसीत प्रणाली

छत्रपती संभाजीनगर, दि.१५ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश पहिल्यांदाच ’समर्थ’ पोर्टलच्या द्वारे होत आहेत. या प्रणालीद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रवेश ते निकालापर्यंतची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील ५५ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण ५५ अभ्यासक्रमांसाठी १५ ते २५ मे दरम्यान ’ऑनलाईन’ नोंदणी करण्यात येणार असून ३ ते १४ जून दरम्यान प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे.

सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील सर्व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे समर्थ पोर्टलद्वारे प्रवेश यावर्षी प्रवेशपूर्व परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहेत. या संदर्भात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली. तसेच युनिव्र्हसिटी नेटवर्कींग अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सेंटर युनिक यांच्याद्वारे ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, समिती अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव आय.आर.मंझा यांच्यासह सर्व समिती सदस्य प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्नशील आहेत.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

समर्थ हा शिक्षण मंत्रालयाने २०१९ मध्ये सुरू केलेला एक उपक्रम आहे, जो माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान शिक्षणावर राष्ट्रीय मिशन अंतर्गत, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्था सक्षम करण्याच्या उद्देशाने आहे. विद्यार्थी, कर्मचारी आणि इतर भागधारकांसाठी योजना, व्यवस्थापन, वितरण आणि सेवांचे निरीक्षण करण्यासाठी डिजिटल फ्रेमवर्कद्वारे. प्रकल्पांतर्गत, संपूर्ण व्यवस्थापित, क्लाउड आधारित, सर्वसमावेशक प्रदान केले जाते जे सानुकूल आहे.

समर्थ उच्च शिक्षणातील धोरणे आणि प्रशासनाच्या मानकांसह तंत्रज्ञानाचे मिश्रण करते आणि ते कधीही-कोठेही डिजिटल इंटरफेसद्वारे संस्था आणि तिच्या भागधारकांना उपलब्ध करून देते. समर्थच्या डिजिटल इंटरफेसद्वारे संस्था त्यांच्या कार्यपद्धती आणि पद्धती सुलभ करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा दर्जेदार अनुभव देऊ शकतात. २०१९ पासून, समर्थचा विस्तार केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, महाविद्यालये, आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या इतर संस्थांसह विविध प्रकारच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये करण्यात आला आहे. या प्रणालीचा यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ’युनिक’चे संचालक डॉ.प्रवीण यन्नावार यांच्यासह सर्व प्रोग्रामर प्रयत्नशील आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!