जिल्हा भूमी अधीक्षक अन् गाडी चालक लाचेच्या सापळ्यात अडकले ! साहेबांना दहा हजारांचे बंद पाकीट द्या अन् मला पाच हजार द्या !!
कोल्हापूर, दि. ८- शेतीच्या पोटहिश्यात दुरुस्ती करून देण्यासाठी जिल्हा भूमी अधीक्षक व वाहन चालक लाचेच्या सापळ्यात अडकले. भूमी अधीक्षकांसाठी दहा तर वाहन चालकांसाठी ५ हजारांची लाच प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१) सुदाम दादाराव जाधव, वय – ५० वर्षे, जिल्हा अधीक्षक, जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख, कोल्हापूर वर्ग-१, सद्या रा. पुण्यप्रवाह सोसायटी, प्लॅट नं. ३०३, नागळा पार्क, डायमंड हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर, मुळ रा. खामसवाडी, ता. कळंब, जि.धाराशिव, २) उदय लगमाना शेळके, वय- ४० वर्षे, वाहन चालक, जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय कोल्हापूर वर्ग – ३, रा. कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या मालकीचे वडीलार्जीत जमीनीची मालकी ही नजरचुकीने चुलत चुलते यांचे नावे लागली होती ती कमी करण्याकरीता म्हणजेच शेतीबाबतचा फाळणी उतारा (पोट हिस्सा) दुरूस्त करून तक्रारदार यांच्या मालकीची शेतजमीन तक्रारदार आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे अन्य सह हिस्सेदार यांच्या नावे लागणेकरता उपसंचालक भूमी अभिलेख पुणे या प्रादेशिक कार्यालयाकडे २०१८ मध्ये अर्ज केला होता. या तक्रारदार यांच्या प्रलबिंत अर्जाची सुनावणी भूमी अभिलेख अधीक्षक कोल्हापूर यांच्या समक्ष सुरू करणेबाबत उपसंचालक यांनी आदेशीत केले होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्याप्रमाणे सदर अपिल अर्जाची सुनावणी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जाधव यांच्या समोर होवून सदर अपीलाचे सुनावणीचा जो काय निर्णय असेल तो तुम्हाला कळविला जाईल असे आम्हाला सांगितले होते. सदर अपिलाचे कामाबाबत मी पाठपुरावा करीत होतो. तक्रारदार यांचे अपिलाचे काय निर्णय झाला याबाबत ते जिल्हा भूमी अभिलेख कोल्हापूर कार्यालयात जाधव यांना भेटण्यास गेले असता तेथे चालक म्हणून नेमणुकीस असलेला उदय शेळके हा तक्रारदार यांना भेटून त्यांच्या कामाबाबत माहिती घेतली. त्यानंतर तक्रारदार यांना चालक उदय शेळके याने जाधव यांना बोललो आहे तुमचे काम पूर्ण करून देणेसाठी जाधव यांना बंद पाकीटातून १५ हजार रूपये दयावे लागतील तसेच माझेही काहीतरी बघावे लागेल असे म्हणाले. त्यावेळी तक्रारदार यांनी कायतरी अॅडजस्ट करा असे म्हणाले त्यावेळी उदय याने साहेबांचे साठी १०,०००/- रूपये द्या व त्यांचेसाठी ५,०००/- हजार रूपये द्या असा असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केली.
तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये लाचेची मागणी व लाच मागणीस संमती दिल्याचे निषन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाई आयोजित केली असता पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदार यांचेकडून आरोपी १) सुदाम दादाराव जाधव, जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख, कोल्हापूर वर्ग – १ यांनी त्यांचेसाठी १०,०००/- रूपये व आरोपी क्रमांक ०२) उदय लगमाना शेळके, वाहन चालक, जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय, वर्ग – ३ यांनी स्वत: साठी ५,०००/- रूपये स्वीकारलेने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांविरूद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अमोल तांबे, पोलीस उपआयुक्त / पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे. डॉ. शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बापु साळुंके पोलीस निरीक्षक, प्रकाश भंडारे, स.पो.फॉ., पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. सुनील घोसाळकर, पो. ना. सुधीर पाटील, पो.ना. पाटील आदींनी पार पाडली.