रोडवर रिक्षा उभी करण्यावरून दुकानदाराने वाद घातल्याने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न !
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ – रोडवर रिक्षा उभी करण्यावरून दुकानदाराने वाद घातल्याने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून रिक्षाचालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दाखळ करण्यात आला आहे.
मीर सफदरअली मीर हैदरअली (वय ३८, वर्षे, चेलीपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद अब्दुल वाजीद मोहम्मद अब्दुल हमीद ( वय ३२ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. मदिना मशिदजवळ, मकसुद कॉलनी, रोशनगेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी सिटीचौक पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहागंज निजामोद्दीन रोडवर डायमंड कुशन दुकाना समोर यातिली फिर्यादी हे त्यांच्या डायमंड कुशन शॉपवर होते.
यावेळी आरोपी मीर सफदरअली याने त्याच्या ताब्यातील रिक्षा वाहन क्र. MH 20 EF 9604 ही घेवून आला व फिर्यादी यांच्या दुकान समोरिल रोडवर उभी केली. तेव्हा ट्रॉफिक जाम झालेली असल्याने फिर्यादी यांनी आरोपीस म्हणाले की, “अरे भाई सफदर तू अपनी रिक्षा रस्ते के बाजुमे लगा, ट्रॉफिक को प्रॉब्लम होता और ट्रॉफिक जाम होती है” असे सांगितले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
यावर आरोपी याने फिर्यादीस शिवीगाळ करुन म्हणाला की, ” तुझे क्या करना है मैं कहीभी गाडी खडी करूंगा तुझे जिसको बुलाना है तु बुलाले ” असे बोलून पुन्हा म्हणाला की, ” देख मैं तेकु अब क्या करता तु बस अब देख मैं अपनी जान देता और तेरे उपर इलजाम लगाता” असे धमकी देवून आरोपी याने त्याच्या हातातील ब्लेडने त्याच्या स्वत:च्या हातावर मारून स्वतःला जखमी करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्र केला.
याप्रकरणी मोहम्मद अब्दुल वाजीद मोहम्मद अब्दुल हमीद ( वय ३२ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. मदिना मशिदजवळ, मकसुद कॉलनी, रोशनगेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह जेठर करत आहे.