सहकारी बॅंका आणि पतसंस्था धडाधड बंद पडू लागल्या अन् अजितदादा म्हणतात सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्यावर भर ! महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या २००० कोटींच्या ठेवी सहकार महर्षिंनी घशात घातल्या अन् ढेकरही दिला नाही !!
पुणे, दि.20 : सहकारी बॅंका आणि पतसंस्था धडाधड बंद पडू लागल्या असून लाखो ठेविदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी बुडाल्यात जमा असून इकडे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा तरुणांना भाबडी आशा दाखवत आहेत. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असल्याने सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्याचा अधिक प्रयत्न करण्यात येईल, असा वादाच त्यांनी केला.
कुलगुरु वि. गं. तथा दादासाहेब केतकर सभागृह अरणेश्वर येथे आयोजित पुणे मर्चंटस को-ऑप बँक लि. शतक महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा व शतकोत्सवी बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमप्रसंगी त्यांनी तरुणांना सहकार क्षेत्रात संधी देण्याचा अधिक प्रयत्न करण्याचा विश्वास दिला. कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, उपाध्यक्ष सुधीर शेळके, संचालक मंडळ उपस्थित होते.
पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात काम करीत असताना राज्याचे हित लक्षात घेऊन पुढच्यादृष्टीने नवीन पिढीला मदत करण्यासाठी नवनवीन कल्पना राबविण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. याबाबत आवश्यकता भासल्यास मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव मांडण्यात येईल. यामुळे तरुणाला सहकार क्षेत्रात संधी मिळण्यास मदत होईल.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी विश्वासहर्ता जपण्याची गरज
महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामुळे विविध बदल झाले आहेत. सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संचालक मंडळांनी विश्वासहर्ता जपली पाहिजे. बँकेचे कामकाज करतांना ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये, ही काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कर्जदारांनीदेखील वेळेत कर्ज परत करावे. यामुळे या क्षेत्रात आर्थिक शिस्त लागण्यास मदत होईल. सहकार क्षेत्राला आणखीन मजबूत करण्यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन करून या क्षेत्रातील अडी अडचणी सोडण्यासाठी शासन सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
चला तर महाराष्ट्रात अलिकडच्या काळात धडाधड बंद पडत चाललेल्या सहकार क्षेत्रातील बॅंका आणि पतसंस्थासंदर्भात जाणून घेवूया, महाराष्ट्रात अलिकडच्या काळात २००० कोटींचा घोटाळा
आदर्श नागरी पतसंस्था, रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, देवळाई महिला, मलकापूर अर्बनच्या घोटाळ्यावर खा. इम्तियाज जलील यांचा संसदेत जोरदार हल्लाबोल !
नवी दिल्ली, दि. ७ – आदर्श नागरी पतसंस्था, रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, देवळाई महिला, मलकापूर अर्बनच्या घोटाळ्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत जोरदार मुद्दा उचलला होता. कमीत कमी २००० कोटींच्या या घोटाळ्यात आरबीआयने इंटरविन करून सहकार डिपार्डमेंटला सहा महिन्यांत सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती.
सहकारी पतसंस्था व सहकारी बँकाच्या घोटाळ्यावर खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सभापती महोदय, देशभरात लाखों ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची दररोज कशी लूट केली जाते याचे उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील काही सहकारी संस्थांबद्दल सांगायचे आहे. या सहकारी पतसंस्थांनी मिळून सर्वसामान्य ठेवीदारांच्या किमान 2000 कोटी रुपयांच्या ठेवी घेऊन फरार झाले. आदर्श नागरी पतसंस्थेचे 62000 ठेवीदार आहेत. रुक्मणी, यशस्विनी, ज्ञानोबा, 80 टक्के ठेवीदार जे माजी सैनिक आहे. ज्यांनी आपले पैसे अशा सहकारी पतसंस्थांत गुंतवले. सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये गुंतवले.
देवळाई महिला, मलकापूर अर्बन, अमरावतीची अनुग्रह, मुंबईतील नागरी पतसंस्था आदींनी मिळून किमान 2000 हजार कोटी रुपये बुडवले. अध्यक्ष मोहदय या सहकारी पतसंस्थांवर RBI किंवा सहकार खात्याचे कोणतेही नियंत्रण नाही. अध्यक्ष महोदय, आदर्श नागरी पतसंस्था माझ्या औरंगाबाद मतदारसंघात येते. 62000 ठेवीदार आहेत. अशा काही महिला आहेत ज्यांची आयुष्यभराची कमाई ₹ 200000 आहे. त्यांनी अशा पतसंस्थेत ₹200000 गुंतवले कारण तेथे व्याजदर जास्त आहे.
लालूच दाखवून लोकांच्या पीएफचे पैसे घेतले जातात. कोणी निवृत्त होत असेल तर त्याच्या निवृत्तीचे पैसे घेतले जातात. आणि हे पैसे घेतल्यानंतर सुरुवातीला ते त्यांना चांगला परतावा देतात. मात्र नंतर ते पैसे घेवून पळून जातात. मी स्वतः सरकारला विनंती करू इच्छितो की RBI ने अशा सहकारी संस्थांमध्ये त्वरित इंटरविन करावे आणि सहकार खात्याला सक्त सूचना द्याव्यात की सहा महिन्यांत सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे परत करावेत.