क्राईमताज्या बातम्या
Trending

पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याने ७ हजारांची लाच मागितली ! गोठा बांधकामाचा मंजूर हप्ता देण्यासाठी मागितली लाच !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ – पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याने ७ हजारांची लाच मागितली. गोठा बांधकामाचा मंजूर हप्ता देण्यासाठी पंचासमक्ष 7,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,000 /- रुपये लाचेची स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याप्रकरणी सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महेश अंकुशराव बोराडे (वय 36 वर्ष व्यवसाय कंत्राटी अभियंता, MRGS पंचायत समिती मंठा, जि. जालना ( वर्ग- कंत्राटी ) रा. मंठा फाटा, मंठा जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांना शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी 77,000 रुपये अनुदान मंजुर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता 9,000 रुपये देण्यात आला आहे. तसेच दि. 12.02.2024 रोजी पंचायत समिती कार्यालय मंठा जि. जालना येथे यातील आरोपीने तक्रारदार यांच्याकडे त्यांचे गाय गोठा बांधकामाचे मंजुर अनुदानापैकी दुसरा हप्ता देण्यासाठी पंचासमक्ष 7,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,000 /- रुपये लाचेची स्वीकारण्याची तयारी दर्शवून स्वीकारण्याचे मान्य केले. आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे मंठा जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर, किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना, सापळा व तपास अधिकारी – सुजीत बडे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना, सापळा पथक – शिवानंद खुळे, जावेद शेख अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!