क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

बीड जिल्ह्यातील युसुफ वडगांव पोलिस स्टेशनचा हवालदार लाचेच्या जाळ्यात ! देशी दारूच्या बॉक्सची वाहतूक करू देण्यासाठी ५ हजार घेतले !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २७- बीड जिल्ह्यातील युसुफ वडगांव पोलिस स्टेशनचा हवालदार लाचेच्या जाळ्यात अडकला. देशी दारूच्या बॉक्सची वाहतूक करू देण्यासाठी ५ हजार रुपये घेताना त्याला पकडण्यात आले.  युसुफ वडगांव पोलीस ठाणेच्या मुख्य प्रवेश द्वारावरच (ता. केज, जिल्हा -बीड) ही कारवाई करण्यात आली.

रावसाहेब गणपत मुंडे (वय,51, पोलिस हवालदार,बक्कल नंबर 643, नेमणूक – युसुफ वडगांव पोलिस स्टेशन, ता. केज, जिल्हा- बीड) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार हे शेतमजूर असून, देशी दारू बॉक्सचे युसुफ वडगांव पो स्टे हद्दीत खेडेगावात वाहतूक करतात. यातील आरोपी पोलिस हवालदार रावसाहेब मुंडे यांनी तक्रारदार यांना पंच साक्षीदार समक्ष पोलिस स्टेशन वडगाव हद्दीत देशी दारूच्या बॉक्सची वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून रुपये 5000/- ची लाच मागणी केली.

पंच साक्षीदारा समक्ष आज, २७ जानेवारी रोजी तक्रारदार यांच्या कडून रुपये 5000/- लाच रक्कम पंच साक्षीदार समक्ष पोलिस ठाणे वडगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वतः स्वीकारली. आरोपी पोलिस हवालदार रावसाहेब मुंडे यांना लाच रकमेसह ताब्यात घेतले आहे. युसुफ वडगांव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, राजीव तळेकर, प्रभारी अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, सापळा पथक ASI विठ्ठल राख, पो.ह.नागरगोजे, पो.ह.सुनील पाटील, चा.पो.अ. चंद्रकांत शिंदे नेमणूक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!