मतदान प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या 507 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !
मतदान प्रशिक्षणास प्रारंभ: पहिल्या दिवशी १७५६ कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण
![](https://bhaskarmarathi.com/wp-content/uploads/2024/04/मतदान-प्रशिक्षण-२.jpg)
छत्रपती संभाजीनगर, दि. 5 :- लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी वेग घेते आहे. काल १०७ औरंगाबाद (मध्य) व १०९ औरंगाबाद (पूर्व) या दोन विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक मतदान अधिकारी अशा तब्बल १७५६ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणांना ५७० कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेतील अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. काल पहिल्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यात वंदेमातरम सभागृह विश्वासनगर किले अर्क परिसर येथे १०७ औरंगाबाद (मध्य) विधानसभा क्षेत्राचे तर सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे प्रांगण, सेव्हन हिल्स जवळ जालनारोड येथे १०९ औरंगाबाद (पूर्व) विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार पल्लवी लिगदे, रमेश मुंडलोड, नायब तहसिलदार देविदास खटावकर यांनी उपस्थितांना प्रशिक्ष दिले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
वंदेमातरम सभागृह येथे आयोजित प्रशिक्षणास ३८२ केंद्राध्यक्ष आणि ५५९ सहा. मतदान अधिकारी असे ९४१ कर्मचारी उपस्थित होते. तर ३४९ गैरहजर होते. तर सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे आयोजित प्रशिक्षणास ३५७ कर्मचारी प्रथम सत्रात तर द्वितीय सत्रात ४६१ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. तर २२१ कर्मचारी दोन्ही सत्र मिळून गैरहजर होते. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. तसेच मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र इ. आवश्यक सामुग्री प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. उद्या, शुक्रवार दि.५ रोजी या दोन्ही प्रशिक्षणांचा दुसरा दिवस असेल.
दरम्यान प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियन १९५१ च्या कलम १३४ प्रमाणे नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघनिहाय होणारे प्रशिक्षणाचे वेळापत्रक-
दि.५ व ६ एप्रिल रोजी
सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे प्रांगण, सेव्हन हिल्स जवळ जालनारोड, छत्रपती संभाजीनगर येथे १०९ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण युनिव्हर्सल हायस्कूल प्लॉट क्रआंक टी/१ एमआयडीसी चिकलठाणा, गरवारे स्टेडियम जवळ छत्रपती संभाजीनगर येथे १०६ फुलंब्री व श्रीनाथ हायस्कूल,पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथे ११० पैठण विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.
दि.६ व ७ एप्रिल रोजी
स्वामी विवेकानंद विद्यालय, जळगाव रोड, सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर येथे १०४ सिल्लोड व जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर येथे १०५ कन्नड विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.
तसेच वंदेमातरम सभागृह, विश्वास नगर, किले अर्क परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे १०८ औरंगाबाद पश्चिम, भोडवे पाटील पब्लिक स्कूल, बजाजनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथे १११ गंगापूर व करुणा निकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा स्टेशन रोड वैजापूर येथे ११२- वैजापूर या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.