क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

बीडमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी, डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी मारली धडक ! मुंबई, ठाणे व परराज्यातील 8 महिलांसह दोन ग्राहक पोलिसांच्या गळाला !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१- बीडमधील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धडक मारून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. मुंबई, ठाणेसह परराज्यातील 8 महिलांसह दोन ग्राहक पोलिसांच्या गळाला लागले. शाहूनगर, अंबिका चौकाजवळ पांगरी रोड बीड येथे ही सायंकाळच्या सुमारास कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एकूण 25,600 रुपये जप्त केले आहे.

माजलगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक केरबा माकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 30/01/2024 रोजी गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली आहे की, बीड शहरात अंबिका चौकाजवळ शाहुनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी एक महिला तिच्या राहत्या घरामध्ये काही महिलांना पैशाचे आमिष दाखवून पर पुरुष ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत आहे. महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे. या माहितीवरून सदर ठिकाणी डमी ग्राहक पाठवून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे वरिष्ठांनी आदेशित केले.

त्यावरुन पोलिस पथक खाजगी वाहनाने शाहूनगर, अंबिका चौकाजवळ पांगरी रोड बीड येथे सदर महिलेच्या राहत्या घराजवळ धडकले. पोलिसांनी छुप्या पद्धतीने गटा गटाने थांबवून एका डम्मी ग्राहकाला सदर महिलेच्या घरी पाठवले. सदर महिलेच्या घराशेजारी रोडवर पोलिसांनी सापळा लावला. त्यानंतर डम्मी ग्राहकाने सदर महिलेच्या घरात जावून खातरजमा झाल्यानंतर बाहेर थांबलेल्या पोलिसांना इशारा केला. डमी ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांनी सदर महिलेच्या घरात छापा टाकला.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

सायंकाळी 17.05 वाजेच्या सुमारास छापा मारला असता सदर ठिकाणी रुममध्ये एक महिला मिळून आली. घरामध्ये एकूण चार रुम असून एका रुम मध्ये 3 महिला, दुसऱ्या रुम मध्ये 3 महिला मिळून आल्या तसेच तिसऱ्या रुममध्ये एक महिला आणि एक पुरुष ग्राहक, चौथ्या रुममध्ये एक महीला आणि एक पुरुष ग्राहक मिळून आले. सदर महिला बीड, ठाणे,  पश्चिम बंगाल, झारखंड, भिवंडी येथील असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. सदर ठिकणी ग्राहक म्हणून आलेले दोघे ईट (ता. जि. बीड) व चिंचवण (ता. वडवणी जि.बीड) येथील असल्याचे समजले.

सदर महिला ही तिच्या राहत्या घरात वेशाव्यवसाय करण्यासाठी प्रती ग्राहक 1000/- रुपये प्रमाणे रक्कम घेत होती. त्यापैकी ती स्वतःसाठी 500 रुपये घेत असे. पोलिसांनी घराची झडती घेवून पंचनामा केला. सदर महिलेच्या ताब्यातून रोख 500 रुपये दराच्या 29 नोटा एकूण 14500, 200 रुपये दराच्या 18 नोटा एकूण 3600 रुपये, 100 रुपये दरच्या 65 नोटा एकून 6500 असे एकूण 25,600 रुपये मिळून आले. याप्रकरणी सदर महिलेवर बीडमधील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!