छत्रपती संभाजीनगर तहसीलमधील कर्मचाऱ्याकडून बॅंक रिकव्हरी महिलेचा विनयभंग, लगट करणे अंगलट !
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ – छत्रपती संभाजीनगर तहसीलमधील कर्मचाऱ्याने बॅंक रिकव्हरी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लगट करणे अंगलट आले असून पोलिस पुढील तपास करत आहे. विठ्ठल बेलकर ,तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव आहे.
दि.24/05/2024 रोजी 15.00 वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे यातील फिर्यादी या रिकव्हरी ऑफीसर म्हणून एका बँकेचे काम करतात. त्यानिमीत्त तहसिल कार्यालयात डी.एम.ची तारीख घेण्यासाठी यातील फिर्यादी या यातील आरोपी विठ्ठल बेलकर यास भेटल्या.
आरोपी विठ्ठल बेलकरने फिर्यादीची विचारपूस करून “तुम्ही खुप सुंदर दिसता,एवढ्या टवटवीत आहात असे बोलून फिर्यादीचा मोबाईल नंबर मागितल्याने फिर्यादीने त्यास मोबाईल नंबर दिला तो त्याने त्याच्या टेबलवर असलेल्या संगणकात फिर्यादीच्या केसमध्ये समाविष्ट केला. नंतर आरोपी विठ्ठल बेलकरने त्याचा मोबाईल नंबर अँड करण्यासाठी फिर्यादीचा मोबाईल हँडसेट मागितला व रात्री 08.30 ते 09.00 वाजेच्या दरम्यान काँल करा व मग बोलू , तुम्ही मला समजून घ्या, मी तुम्हाला समजून घेतो.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
या पुढे तुमचे डी.एम.चे तारखेचे कुठलेही काम अडकणार नाही,असे फिर्यादीस तो म्हणाला. परंतू फिर्यादीने त्याला मोबाईल हँडसेट दिला नाही व त्याचा मोबाईल नंबरही घेतला नाही. त्यानंतर आरोपी विठ्ठल बेलकरने त्याच्या शेजारी फिर्यादीस चेअरवर बसण्यास सांगितले व त्याचेजवळ असलेल्या बँग मधून पाण्याची बाँटल काढून फिर्यादीस दिली.
त्यानंतर त्याने स्पर्श केल्याचे फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणा विठ्ठल बेलकर याच्यावर सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं – 179/2024 कलम 354 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि प्रशांत मुंडे करत आहेत.