ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

सिडको उड्डाणपुलावरील एका बाजुची वाहतूक १८ ते २८ एप्रिल दरम्यान रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत राहणार बंद !

छत्रपती संभाजीनगर, दि. १५ –सिडको उड्डानपुलावरील दोन टप्प्यात एका बाजूची वाहतूक १८ ते २८ एप्रिल दरम्यान रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे. उड्डाणपुलावर थर्मोप्लास्टीक पट्टे मारणे व कॅट आईज बसविण्याचे कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहूक शाखेने वाहनधारकांसाठी पर्यायी मार्गही सूचवला आहे.

यासंदर्भात वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनी दिलेली माहिती अशी की, श्री बालाजी रोड सेफ्टी, नांदेड यांनी जळगाव टी पॉईंट सिडको उड्डाणपुलावर थर्मोप्लास्टीक पट्टे मारणे व कॅट आईज बसविण्याचे काम करणेकरीता रात्री २३.०० ते ०७.०० वाजे पर्यंत वाहतूक बंद करण्याची परवानगी मिळणे बाबत विनंती केली आहे. त्या अनुषंगाने सिडको उड्डाणपुलावर थर्मोप्लास्टीक पट्टे मारणे व कॅट अॅय बसविण्याचे काम करण्याकरीता खालील प्रमाणे मार्गात बदल करण्यात आला आहे.

१) दिनांक १८/०४/२०२४ ते दिनांक २३/०४/२०२४ पर्यंत रात्री २३.०० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत सिडको उड्डाणपुलाची छत्रपती संभाजीनगर कडून जालनाकडे जाणाऱ्या रोडची डावी बाजु वाहतुकीसाठी बंद राहील. सदर मार्गावरील वाहतूक सिडको उड्डाणपुलाच्या खालून चालू राहील.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

२) दिनांक २४/०४/२०२४ ते दिनांक २८/०४/२०२४ पर्यंत रात्री २३.०० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत सिडको उड्डाणपुलाची जालना कडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी उजवी बाजू वाहतूकीसाठी बंद राहील. सदर मार्गावरील वाहतूक सिडको उड्डाणपुलाच्या खालून चालु राहील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!