सिटी चौक ते गुलमंडी रस्त्यावरील फुल, अत्तर विक्रेत्यांना अतिक्रमण काढण्याचे अल्टिमेटम ! आज पाहणी, सोमवार पासून थेट सामान जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारणार !
छत्रपती संभाजीनगर, दि.२६ – शहरातील सिटी चौक ते गुलमंडी पार्किंग या मार्गावरील अतिक्रमणधारक आता महापालिकेच्या रडारवर आले आहेत. महानगरपालिकेने आज या रस्त्यावरील अतिक्रमणाची पाहणी करून सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिला असून सोमवारपर्यंत अतिक्रमण काढून न घेतल्यास सामान जप्तीची तंबी आज देण्यात आली.
आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील सिटी चौक ते गुलमंडी पार्किंग पर्यंतच्या अतिक्रमणाची पाहणी केली. या रस्त्यावर फुल, अत्तर विक्रेते यांनी छोट्या वाहतुकीचे रोड बंद करून त्या ठिकाणी दुकाने मांडले आहेत.
आज या ठिकाणी पाहणी करत असताना ३ दुकानदारांवरती प्रती ५०००/- रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. असे एकूण १५०००/- दंड वसूल करण्यात आला. तसेच या ठिकाणी असलेले इतर अतिक्रमण धारकांनी आपले दुकानांचे अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा सोमवार पासून थेट सामान जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
या पाहणी वेळी इमारत निरीक्षक मजहर अली, सागर श्रेष्ठ, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, अतिक्रमण विभाग व नागरी मित्र पथकाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.