ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रारुप विकास आराखड्यावर सुनावणीचा तिसरा टप्पा ६ जूनपासून ! या टोल फ्री नंबरवर फोन करून घ्या अधिकची माहिती !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्द क्षेत्राच्या प्रारुप विकास आराखड्यावर सुनावणीचा तिसरा टप्पा ६ जूनपासून ठेवण्यात आला आहे. ही तिसरा टप्पा दि.०६/०६/२०२४ पासून दि.१२/०६/२०२४ पर्यंत ठेवण्यात आला आहे. यामध्ये सेक्टर क्र.६ ते १० व इतर मधील ३३४८ आक्षेपकर्ते, यांचा समावेश करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्द क्षेत्राची प्रारुप विकास योजना नियुक्त अधिकारी यांनी तयार केली असून, त्यावर नागरिकांच्या सूचना/हरकती मागविणेकामी ती दि.०७/०३/२०२४ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रारुप विकास योजनेबाबत विहीत कालावधीमध्ये आलेल्या सूचना/हरकतींबाबत सुनावणी देणेकामी, शासनाने दि.०३/०४/२०२४ रोजीचे आदेश क्र. १४६ अन्वये नियोजन समितीमधील तज्ञ सदस्यांची नेमणूक केली आहे.

त्याअनुषंगाने नियोजन समिती गठीत करण्यात आली आहे. सूचना/हरकतधारकांना सुनावणी देणेकामी प्रथम टप्प्यात दि.१५/०५/२०२४ ते दि.२०/०५/२०२४ पर्यंत सेक्टर क्र.१,१६,२,३ येथील उपस्थित एकूण ९५५ आक्षेपधारकांना सुनावणी देण्यात आली आहे. तद्नंतर दुस-या टप्प्यात दि.२७/०५/२०२४ ते दि.०२/०६/२०२४ पर्यंत सुनावणी देण्यात येणार आहे. सदर दुस-या टप्प्यामध्ये दि.२९/०५/२०२४ पर्यंत सेक्टर क्र.३ (उर्वरीत) व ४ येथील उपस्थित एकूण ८७४ आक्षेपधारकांना सुनावणी देण्यात आली आहे. दि.३०/०५/२०२४ रोजी सेक्टर क्र.४ मधील एकुण २६० आक्षेपकत्यांना, दि.३१/०५/२०२४ रोजी सेक्टर क्र.४ (उर्वरीत) व ५ मधील एकूण ५२६ आक्षेपकर्त्यांना तर दि.०१/०६/२०२४ रोजी सेक्टर क्र. क्र.५ मधील एकूण ५२५ आक्षेपकर्त्यांना तर दि. ०२/०६/२०२४ रोजी सेक्टर क्र. ६ मधील एकूण ५२५ आक्षेपकऱ्यांना सुनावणीकरीता आमंत्रित करण्यात आले आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

सुनावणीचा तिसरा टप्पा दि.०६/०६/२०२४ पासून दि.१२/०६/२०२४ पर्यंत ठेवण्यात आला आहे. यामध्ये सेक्टर क्र.६ ते १० व इतर मधील ३३४८ आक्षेपकर्ते, यांचा समावेश करण्यात आला आहे. आक्षेपकर्ते नागरिकांना सुनावणीची नोटीस पोस्ट विभागामार्फत पाठविण्यात आली असून व्हॉट्सअॅप मेसेज देण्यात आले आहेत. त्यानुसार आक्षेपकत्यांनी त्यांना दिलेल्या वेळेमध्ये सुनावणीसाठी स्थळ छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान जवळ, शासकीय कर्करोग रुग्णालयासमोर, छत्रपती संभाजीनगर-४३११०१ येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्या आक्षेपकर्त्यांनी विहीत मुदतीत मनपाकडे आक्षेप नोंदविला आहे परंतु काही कारणामुळे सुनावणी नोटीस/मेसेज प्राप्त झालेला नसल्यास अशा आक्षेपकर्त्यांना त्यांचेकडील मनपाचे पोचपावतीनुसार दि.१३/०६/२०२४ व दि.१४/०६/२०२४ रोजी सुनावणीची संधी देण्यात येणार आहे.

सर्व आक्षेपकत्यांचे सुनावणी दिनांक व वेळ समजून घेण्याच्या सोयी करीता, मनपामार्फत टोल फ्री फोन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. खाली नमूद टोल फ्री क्रमांकावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यत संपर्क साधून आक्षेपकर्त्यांना सुणावणीबाबत संदिग्धता असल्यास त्याबाबत शंका समाधान करण्यात येण्याबाबत सुविधा चालू करण्यात आली आहे. टोल फ्री नंबर १८००१२१२९१६, वेळ सकाळी ११.०० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत संपर्क साधता येईल.

आक्षेपकर्ते नागरिकांनी त्यांना दिलेल्या सुनावणीच्या संधीचा वापर करून आपले आक्षेप/हरकत/सूचना “शासन नियुक्त नियोजन समिती” समोर मांडण्यात याव्यात जेणेकरून नियोजन समितीस प्राप्त लेखी हरकत/सूचना तसेच सुनावणी दरम्यान मांडण्यात आलेले म्हणणे यांचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेणे व अहवाल नियुक्त अधिकारी” यांचे मार्फत शासनास सादर करणे सुकर होईल, अशी माहिती मनपाने दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!