महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांना कराबाबतच्या आक्षेप, तक्रारी समाधान शिबिरात नोंदवता येणार !
महानगरपालिकेच्या वतीने आता कर समाधान शिबिर
छत्रपती संभाजीनगर, दि.५ – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आता महानगरपालिका मुख्यालय येथे कर समाधान शिबिर आयोजीत करण्यात येणार आहे.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांचे मालमत्ता कराबाबत आक्षेप /तक्रारी निकाली काढण्यासाठी व त्यांचे शंकेचे निरसन होऊन त्यांना कराचा भरणा सुलभतेने होण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक,छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका यांच्याकडे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत महानगरपालिका मुख्यालय येथे कर समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
सदर शिबिरामध्ये सबंधित मालमत्ता धारकांना त्यांच्या कराबाबत आक्षेप /तक्रारी असल्यास सबंधित प्रशासकीय (झोन ) कार्यालयमध्ये अर्ज दाखल करून कर समाधान शिबिरात उपस्थित राहता येईल अशी माहिती उप आयुक्त ०२ (कर) अपर्णा थेटे यांनी प्रशासनाच्या वतीने दिली. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe