ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्द क्षेत्राच्या प्रारुप विकास आराखड्यावर सुनावणीदरम्यान उद्यापासून सूचना/हरकतींचा पडणार पाऊस !

छत्रपती संभाजीनगर, दि. १४ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्द क्षेत्राचा नुकताच प्रारुप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून सूचना/हरकतधारकांना सुनावणी देणेकामी प्रथम टप्प्यात दि.१५/०५/२०२४ ते दि.१८/०५/२०२४ दरम्यान सकाळी १०.०० वा. ते सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत सुनावणी आयोजित केली आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्द क्षेत्राची प्रारुप विकास योजना नियुक्त अधिकारी यांनी तयार केली असून, त्यावर नागरीकांच्या सूचना/हरकती मागविणेकामी ती दि.०७/०३/२०२४ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रारुप विकास योजनेचे व्यापक प्रसिध्दीकरण करण्यात आले आहे. सदर प्रारुप विकास योजनेबाबत विहीत कालावधीमध्ये आलेल्या सूचना/हरकतींबाबत सुनावणी देणेकामी, शासनाने दि.०३/०४/२०२४ रोजीचे आदेश क्र. १४६ अन्वये नियोजन समितीमधील तज्ञ सदस्यांची नेमणूक केली आहे.

त्याअनुषंगाने नियोजन समिती गठीत करण्यात आली आहे. सूचना/हरकतधारकांना सुनावणी देणेकामी प्रथम टप्प्यात दि.१५/०५/२०२४ ते दि.१८/०५/२०२४ दरम्यान सकाळी १०.०० वा. ते सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत, छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान जवळ, शासकीय कर्करोग रुग्णालयासमोर, छत्रपती संभाजीनगर-४३११०१ या कार्यालयात सुनावणी आयोजित केली आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

प्राप्त सूचना/हरकतधारकांना सुनावणी अनुषंगाने सुनावणीचा दिनांक व वेळेबाबत स्वतंत्र नोटीसीव्दारे यापूर्वीच कळविण्यात आले आहे. तसेच आक्षेपकर्त्यांना, त्यांनी नमूद केलेल्या भ्रमणदुरध्वनी क्रमांकावर संदेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सूचना/हरकतधारकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी प्राप्त नोटीसीसह तसेच आवश्यक ओळखपत्रांसह सुनावणीसाठी स्मार्ट सिटी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!