ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

एन ११ गजानन नगर येथील अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! सौभाग्य मंगल कार्यालय ते नवजीवन कॉलनी रस्त्याने घेतला मोकळा श्वास !!

छत्रपती संभाजीनगर, दि.२२ – महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागा मार्फत आज हडको एन ११ येथील गजानन नगर परिसरातील रस्त्यावरचे एकूण १५अतिक्रमण काढून टाकरण्यात आले. सौभाग्य मंगल कार्यालय ते नवजीवन कॉलनी रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

सौभाग्य मंगल कार्यालयापासून गजानन नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक नागरिकांनी पंधरा बाय पंधरा दहा बाय वीस दहा बाय दहा व पाच बाय पाच अशा लहान मोठ्या लोखंडी टपऱ्यांचे अतिक्रमण करून जवळच्या खुल्या जागेत भाजी मंडई भरविली जात होती. यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता मोकळा मिळत नव्हता. सर्व भाजी विक्रेते सह टपरीधारक यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे याबाबत आयुक्तांकडे ऑनलाईन व लेखी तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे तसेच उपायुक्त सविता सोनवणे यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी या भागात पाहणी केली होती.

सर्व व्यापाऱ्यांना अनधिकृत टपरी धारकांना व इतर अतिक्रमण धारकांची प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना दोन दिवसांचा अवधी देऊन सर्व अतिक्रमण काढणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले होते तर इतर पंधरा लोकांनी हे अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे न काढल्याने आज महानगरपालिकेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने हे अतिक्रमण निष्काशीत करण्यात आले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

यामध्ये कारवाई करत असताना सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा विरोध झाला परंतु नंतर त्याच भागातील ज्येष्ठ नागरिकांनी विरोध करणाऱ्यांना कारवाई बाबत समजावून सांगितले. ही कारवाई सर्वांसाठी चांगली आहे.अत्यावश्यक वेळी अग्निशमन व रुग्णवाहिका येण्यासाठी रस्ता मोकळा मिळणार आहे. यांनतर लोकांनाही नंतर प्रशासनास सहकार्य केले व स्वतःहून आपल्या घरासमोरील ओटे शेड काढण्यासाठी मदत केली. आज सकाळी महापालिकेच्या जेसीबीच्या वतीने लोखंडी टपऱ्या, लोखंडी कपाटे व लोखंडी बॉक्स जप्त करण्यात आले. तर इतर नागरिकांनी फक्त आजूबाजूचे पत्रे काढले होते.

शेड व ओटे न काढल्यामुळे जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले व रस्ता मोकळा करण्यात आला. सदर कारवाई गजानन नगर ते नवजीवन कॉलनी या रस्त्यावर प्रामुख्याने राबविण्यात आली आहे. इतर ठिकाणी ज्या नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे व अद्याप ही आपले अतिक्रमण स्वतः काढले नाही अशा अतिक्रमण धारकांविरुद्ध याच ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानुसार बुधवारी किंवा गुरुवारी पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एन ११ मुख्य रस्ता स्मशानभूमी जवळ असलेले अनधिकृत व्यवसाय करणारे ट्रॅक्टर रेती खडी यांच्या विरुद्ध ही कारवाई करून त्यांना हटविण्यात आले आहे.

सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे, उपायुक्त अतिक्रमण सविता सोनवणे, प्रभाग अधिकारी अशोक गिरी अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद ,यशोदा पवार, सौरभ खेडे, अश्विनी कोथलवार जेसीबी चालक, माजी सैनिक यांनी कारवाई सहभाग घेतला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!