ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

सिडको तिरुपती पार्क परिसरातील ३८ अनधिकृत नळ तोडले ! नवीन HDPE जलवाहिनीमुळे जुन्या जलवाहिनीवरील चोरीचा मामला उघड !!

महानगरपालिकेच्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले

छत्रपती संभाजीनगर, दि. १५ – सिडको एन ०४ येथील तिरुपती पार्क मधील ३८ अनाधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. अनाधिकृत नळ जोडण्यामुळे जे नागरिक कर भरून अधिकृत नळ जोडण्या घेत आहेत त्यांना या अनाधिकृत नळ जोडण्याचा फटका बसत आहे.

आज आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथकचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त -२ तथा मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे यांच्या अधिपत्त्याखाली तिरुपती पार्क, एन-४ सिडको या भागात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या जुन्या १५० मिमी जलवाहिनी वरील एकूण ३८ अनधिकृत नळ खंडित करण्यात आले.

सदरील ठिकाणी नवीन HDPE जलवाहिनी टाकण्यात येत असल्याने येथील जुन्या जलवाहिनी वरील सर्व अनधिकृत नळ खंडित करण्यात आले. ज्या नागरिकांचे नळ सध्या अनधिकृत आहेत असे नळ त्यांना नवीन HDPE जलवाहिनी वर अधिकृतपणे कंपनी द्वारे रीतसर नळ जोडण्या करून देण्यात आल्या असून उर्वरित खंडित करण्यात आल्या आहेत.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

शहरात अनेक ठिकाणी अश्या नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चालू असल्याने पथक निरीक्षण करून अनधिकृत नळ खंडित करण्याची मोहीम देखील चालू आहेत, अशी माहिती पथक अभियंता रोहित इंगळे यांनी दिली.

सदरील कारवाही उप अभियंता महेश चौधरी, पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता कल्याण सातपुते आणि
पथक कर्मचारी मो. शरीफ, वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार आदींनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!