डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला झुडपात बलात्कार, आरोपी फुलंब्री तालुक्यातील !
छत्रपती संभाजीनगर, दि. १७ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लेणीकडे जाणाऱ्या रोडने रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपात बलात्कार झाल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. हा प्रकार १२ एप्रिल रोजी १४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लेणीकडे जाणार्या रोडने रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शिवा सुखदेव साठे (ता. फुलंब्री) असे आरोपीचे नाव आहे. यातील आरोपीने फिर्यादी महिलेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लेणीकडे जाणाऱ्या रोडने रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडे झुडपात नेले. फिर्यादीचे तोंड दाबले व फिर्यादी च्या सोबत बळजबरी करु लागला. फिर्यादी त्यास विरोध करीत होती परंतु त्याने फिर्यादीचे काहीएक ऐकले नाही व फिर्यादीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये शिवा सुखदेव साठे (ता. फुलंब्री) याच्यावर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा.पो.नि.सो यांचे आदेशाने डी.ओ. अधिकारी पोउपनि भालेराव यांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोउपनि भालेराव हे स्वतःकरीत आहेत
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe