ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनिल बोरसे !

छत्रपती संभाजीनगर, दि.५ : जिल्हा शिवजयंती महोत्सव समीतीच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार असून जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती २०२४ च्या अध्यक्षपदी अनिल बोरसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोमवारी (दि.५)  आयोजित बैठकीत संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात ही निवड करण्यात आली.

जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे यंदाचे हे ५५ वे वर्ष असून या समितीची स्थापना १९७० मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पवार यांनी केली होती. अखंड पणे सातत्यपूर्ण आणि एकात्मतेचा संदेश देणारी एवढी जुनी महोत्सव समिती देशात एकमेव असून अनेक समाजोपयोगी उपक्रम समितीद्वारे राबवण्यात येत आहे. संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात यंदाचीही शिवजयंती महोत्सव समिती एकात्मतेचा संदेश देणारी ठरेल असा विश्वास आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आला.

मावळते अध्यक्ष हर्षवर्धन कराड यांनी मागील वर्षी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक कार्यक्रम तसेच उपक्रमाचा अहवाल सादर केला. हर्षवर्धन कराड यांनी अध्यक्ष पदासाठी सुचवलेल्या अनिल बोरसे यांच्या नावास राजेंद्र दानवे, यांनी अनुमोदन दिले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

यावेळी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष तनसुख झांबड, डी.एन पाटील, विनोद पाटील, अभिजित देशमुख, पंकज फुलफगर, विजय औताडे, राजेंद्र जंजाळ, विजय वाघचौरे, राजू शिंदे, बाळासाहेब औताडे, किशोर तुळशीबागवाले, प्रा. मनोज पाटील, विकास कुलकर्णी, प्रशांत शेळके, सतीश मेटे, ज्ञानेश्र्वर शेळके, प्रवीण चव्हाण, किरण डोरले, गणेश जाधव, प्रदीप हरदे, आबा लोखंडे, बाबासाहेब साबळे, सचिन खैरे, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, संदीप शेळके, हरीश शिंदे, अशोक मोरे, आत्माराम शिंदे, राजू पारगावकर, सचिन मिसाळ, कुणाल मराठे, यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती होती. राजेंद्र दाते पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अभिषेक देशमुख यांनी मानले.

यंदाची शिवजयंती अविस्मरणीय करणार- अनिल बोरसे

छत्रपती संभाजीनगर शहराला एक वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या शहरातील प्रत्येक शिवप्रेमींच्या सहभागाने ही शिवजयंती अविस्मरणीय करणार असल्याची ग्वाही आयोजित बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल बोरसे यांनी दिली. शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात यानुसार ही शिवजयंती प्रत्येकांच्या सहभागाने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करणार असल्याचे महोत्सव समिती अध्यक्ष अनिल बोरसे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!